सरिता सातारडे यांच्या “अस्वस्थतेचे संदर्भ” या ई-बुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आॅनलाईन काव्यसंमेलनाला रसिकांनी दिली दाद

Spread the love
  • थिंक टँक पब्लिकेशनची  दर्जेदार साहित्यकृती

नागपूर : नागपूर येथील कवयित्री /लेखिका सरिता सातारडे लिखित व थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर प्रकाशित “अस्वस्थतेचे संदर्भ” या ई-बुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन धम्मचक्र प्रवर्तनदिनी ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडले.

विचार यश मासिक व शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आॅनलाईन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरिता सातारडे, नागपूर होत्या. तर आंबेडकरी, बौध्द विचारधारा व मातृसंघटनेचे प्रचारक, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते “The Champ” या नावाने लेखन करणारे पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत राजेश देशमुख यांच्या हस्ते नागपूर येथील कवयित्री /लेखिका सरिता सातारडे यांच्या “अस्वस्थतेचे संदर्भ” या हिंदी/मराठी ईबुक काव्यसंग्रहाचे आॅनलाईन काव्यसंमेलनात प्रकाशन झाले. त्याचबरोबर भंडारा येथील अस्मिता प्रशांत ‘पुष्पांजली’ यांच्या प्रियंवदा या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन झाले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रज्ञा मेश्राम, नागपूर यांनी केले. कार्यक्रमात सहभागी कवी/कवयित्री अस्मिता मेश्राम, भंडारा, शालिनीताई मांडवधरे, अमरावती, उमा किशोर गजभिये, गोंदिया, अरूण बुंदेले, अमरावती, मधु माहेश्वरी, गुवाहाटी, आसम, विद्याताई निसरगंध, बिड, सुषमा कळमकर, नागपूर, पल्लवी जीवन तारे, नागपूर, शुभांगी जुमळे, प्रतिभा सहारे, अविनाश गोंडाणे, अमरावती, कविता काळे, पुणे, अशोकजी पवार इत्यादींनी कार्यक्रमात सहभाग दर्शविला.

कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश देशमुख यांनी ‘खरे सांगतो बाबा’ या रचनेत या जातीवाद्यांच्या गळ्यात एकदा झाडू आणि मडके बांधावे वाटते. ही रचना सादर करून भारतातील सामाजिक विषमतेवर ताशेरे ओढले. मधू माहेश्वरी यांनी “जीना जरूरी या जिंदा रहना ‘ या रचनेत जिंदा रहने के लिये जीना पडता है और सत्कर्म की फसल उगानी पडती है इस तरह के विचार प्रेषित किये! पल्लवी जीवनतारे यांनी विखुरलो जरी कनाकनात, विसरलो नाही भीमा तूला ही क्रांतिकारी रचना सादर केली. प्रा. अरूण बुंदेले यांनी’ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात, गाजले बुध्द जगात’ गौतमाच्या धम्माची दिक्षा देऊन बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची महती आपल्या सुंदर अंभगातून सादर केली. प्रज्ञा मेश्राम यांनी भारतीय समाजात महिलांवरून ज्या शिव्या दिल्या जातात त्यावर ताशेरे ओढणारी परखड रचना सादर केली. शालिनीताई मांडवधरे यांनी इतिहासाचे पान बाबासाहेबांनी पलटविले आणि आम्हाला दिक्षाभूमी चे दान पदरात दिले अशा आशयाची रचना सादर केली. विद्याताई निसरगंध यांनी अज्ञानाच्या काळोखात मरणयातना सोसत असतांना आशेचा किरण दिसत नव्हता अशावेळी माणूस बनलो आम्ही फक्त भीमामूळे अशी आशयरचना सादर केली.

जयभीम नारा देतांना शुभांगी जुमळे म्हणतात, बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणले आणि बुध्दा चा धम्म दिला.सुषमा कळमकर यांनी बाबासाहेबांनी धम्मदिक्षा विजयादशमी देऊन दिक्षाभूमी पवित्र केली या आशयाची रचना सादर केली. प्रतिभा साहारे यांनी माझेच मला दाखवतात अंधाराची वाट. बुध्दं आंबेडकर दारावर आणि मनधरणी देवाची करतात. 22 प्रतिज्ञेचा लोकांना पडलेला विसर या सर्व गोष्टींवर खंत व्यक्त केली. विद्रोही कवी अविनाश गोंडाणे यांनी “हे क्रांती सुर्या आमच्या भंगार आयुष्याला तू आकार दिलास मानवनिर्मितीची ही पहिली प्रक्रिया होती ही रचना सादर केली. प्रीतीबाला शामकुंवर यांनी उध्वस्त झालेल्या मनुष्यत्वात प्राण फुंकले, समता स्वातंत्र्याची नीव ठेवली. चैतन्यरूपी बुध्दा चा धम्म प्रकाशित केला.
अशोकजी पवार यांनी खूप जणांनी दगड मांडले त्या दगडाचे पूजन केले आणि हळूहळू या देवाने माणसाचे दगड केले.
अस्मिता मेश्राम यांनी हलाहला ला अमृत करण्याचे सामर्थ्य बुध्दांच्या धम्मामध्ये आहे या आशयाची रचना सादर केली.

सरिता सातारडे यांनी क्या कहू तूम्हे जयभीम क्या है? इस रचना के माध्यम से ‘जयभीम’ शब्द की महत्ता बताई है.
जिस महामानव के संविधान से ये देश चलता है उनको सजदा करने की कृतांजली ‘जयभीम’ है!
कार्यक्रमाचा सुंदर, प्रखर आणि ओजस्वी समारोप कविता काळे यांनी केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अस्मिता प्रशांत ‘पुष्पांजली’ यांनी परिश्रम घेतले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका