“समृध्द”च्या महेश मोतेवारची दलिंद्री अवस्था
बीड येथे पोलिसांनी तपासासाठी आणले
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
समृध्द जीवन कंपनीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार याचे बीड पोलिस स्टेशनमधील दलिंद्री अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. देशभरात करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या माणसाची ही अवस्था पाहून आपले पैसे कसे मिळतील याची त्यांना चिंता वाटत आहे.
समृद्ध जीवन फुडस इंडिया लिमिटेड व अन्य ३४ कंपन्याच्या नावे सुरू केलेल्या समृद्ध जीवनमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने गुंतवणूक करण्यात आली. प्रारंभी खातेदारांना वेगवेगळी अमिषे दाखवून दुचाकी, चारचाकी व अन्य बक्षिसे मोठ्या प्रमाणात ठेवली. त्यामुळे संपूर्ण देशभरातून 20 लाखापेक्षा जादा लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले.
या कंपनीने 15 सप्टेंबर 2015 पासून गूंतवणुकदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने या समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवर यांना 27 डिसेंबर 2015 रोजी तक्रारीअंती ताब्यात घेतले. त्यावेळपासून ही समृद्ध जीवन कंपनी बंद पडलेली आहे.
सांगोला तालुक्यात ६० कोटीचा गंडा
समृद्ध जीवन फुडस इंडिया लिमिटेड व अन्य ३४ कंपन्याच्या नावे सुरू केलेल्या समृद्ध जीवनमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने गुंतवणूक करण्यात आली. पण 2015 सालापासून या समृद्ध जीवनने गाश्या गुंडाळल्याने सांगोला तालुक्यातील १५ हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची ६० कोटी रुपयाची देणी रखडलेली आहेत.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची संख्या 35 हजाराच्या पुढे होती. विशेषतः सांगोला तालुक्यातील 15 हजाराहून अधिक जणांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. सप्टेंबर 2015 पासून या गुंतवणूक केलेल्या रक्कमांचे परतावे अजून दिले गेले नाहीत. त्यामुळे सांगोला तालुक्यातील 60 कोटीचा पुढे रक्कमा थकलेल्या आहेत,
जिल्हात समृद्ध जीवनच्या सोलापूर, अकलूज, मोहोळ, बार्शी, करमाळा, अक्कलकोट व सांगोला अशा सात शाखा होत्या. पैसे गुंतवण्यामध्ये जिल्ह्यात सांगोला शाखा अव्वल होती. सांगोला शाखेमध्ये दरमहा 1 कोटीच्या पुढे व्यवसाय होत होता. पण
कोण होतास तू.. काय झालास तू?
आकर्षक व्याजदर, साखळी बिजनेस, शेळ्या, मेंढ्या, गाई, कोंबड्या, मल्टिस्टेट, मी मराठी चॅनेलचा चेअरमन…हेलिकॉप्टरमधून फिरणारा आणि लोकांना स्वप्न दाखवून त्याचा चुराडा करणारा मोतेवार. काय परिस्थिती झाली बघा, परवा बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला अटक करून आणण्यात आले. त्यावेळी काढलेले फोटो व्हायरल झाले. त्याच्याकडे अंगावरचे कपडे एक गोळ्यांची पिशवी फक्त एवढे साहित्य होते.
काळ इथेच सगळ्या पापाची फळे देतो, आणि जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत सगळं जग मुंगळे होऊन तुम्हाला चिटकून राहतं. विशेष म्हणजे याच मोतेवारने अनेक नेत्यांना फंडिंग देखील केलेलं होतं, अशी चर्चा आहे. तोच आज तुरुंगाची हवा खात आहे.
22 राज्यात त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका राज्यात जामीन झाला की दुसऱ्या ठिकाणचे पोलीस उचलतात ही परिस्थिती आहे. मोतेवार हा देशभरात एकाच दिवशी रक्तदान शिबीर घेत होता. राजकीय नेत्यांसोबत उठ-बस होती. मराठी न्यूज चॅनेल, त्याच्या जाहिराती, दूध डेअरी, मल्टिस्टेटचे कोटीच्या घरातील व्यवहार, अचानक सगळं बंद झालं आणि ठेवीदारांचे पैसे बुडाले.
बीड जिल्ह्यात देखील पतसंस्था आणि मल्टिस्टेटचे जाळे मोठे होत आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहून फसवणूक होणार नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी…अन्यथा दुसरा मोतेवार तुमची फसवणूक करेल.