श्रद्धा वालकर होऊन खांडोळ्या करून घ्यायच्या की धर्मरक्षण, तुम्हीच ठरवा
संभाजी भिडे गुरुजींनी केले मुलींना आवाहन
थिंक टँक न्यूज नेटवर्क
देशात आणि राज्यात लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे. यातून श्रद्धा वालकरसारख्या मुलीचा अंत झाला हे विसरून चालणार नाही. स्वतःच्या आई-वडिलांचे संस्कार विसरून श्रद्धा वालकरसारख्या स्वतःच्या खांडोळ्या करून घ्यायच्या की धर्मरक्षण करायचं हे मुलींनी ठरवणं गरजेचं आहे, असे प्रखर मत , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी मांडले.
सोलापूर येथे सुशील रसिक सभागृहात भिडे गुरुजींची ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि ‘खडा पहारा’ या विषयावर बैठक झाली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती.
भिडे गुरुजी पुढे म्हणाले की, लव्ह जिहादचे प्रमाण वाढत असताना शासनाने गप्प बसू नये. यावर काही तरी कायदेशीर तोडगा काढून याचे प्रमाण कमी करण्यासाठी हालचाल करावी. अन्यथा आणखी अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतील. केवळ जय श्रीराम आणि जय शिवराय म्हणून चालणार नाही. त्यांचे विचार अंगी. बाणवून आपल्या प्रभागापुरतं, आपल्या वॉर्डापुरतं, आपल्या शहरापुरतं आणि आपल्या घरापुरतं आपल्या महिलांचे आया-बहिणींचे संरक्षण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांनी घेणे गरजेचे आहे.
तरुणांनी प्रशासनाचे काम करावे
अशावेळी तरुणांनी लोकशाहीचा, शिवरायांच्या स्वप्नातील प्रशासनाचे काम करायला हवं. प्रत्येक माणसाने प्रशासनाची भूमिका करायला हवी, तरच सगळं काही स्थिर होऊ शकेल.
३२ मण सुवर्ण सिंहासनाचे ७० टक्के काम पूर्ण
दुर्गराज श्री किल्ले रायगडवर होणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन हे हिंदुस्थानच्या अस्मितेचे प्रतीक ठरणार आहे. दुर्गराज किल्ले श्री रायगडावर ४ जून २०१७ रोजी १ लाख १२ हजार धारकऱ्यांनी ३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा एकदा दुर्गराज किल्ले श्री रायगडावर स्थापन करण्याचा संकल्प केला आहे . त्यानुसार महाराष्ट्रभरातून ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या कामाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ७० टक्के काम होत आले आहे.
दररोज १० हजार जणांचा पहारा
हे सिंहासन पूर्ण झाल्यानंतर आता पुढच्या काळात आणखी जबाबदारी वाढणार आहे. सुवर्ण सिंहासन स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील ३६० तालुक्यांतून दररोज एका तालुक्यातील १० हजार धारकरी दुर्गराज श्री किल्ले सुवर्ण सिंहासनाच्या पहाऱ्यासाठी जाणार आहेत. यासाठी अधिकाधिक हिंदूंनी रायगडावर पहाऱ्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही भिडे गुरुजी यांनी यावेळी केली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्येयमंत्राने बैठकीचा समारोप झाला.
व्यसनांपासून दूर राहा
तरुणांनो व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नका. आपल्या अंगात रग आहे तोपर्यंत काही तरी इतिहास घडवण्याचा प्रयत्न करा. तरच आपलं जीवन सार्थकी लागेल. अन्यथा व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन स्वतःला संपवायला वेळ लागणार नाही, असा अनमोल सल्ला यावेळी तरुणाईला भिडे गुरुजी यांनी दिला.
हेही वाचा