ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

शेतीला मजुरच मिळेनात

विदारक चित्र; रब्बीत मकाच जोमात

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
शेतमजूर हा शेतीक्षेत्राचा मुख्य कणा आहे. चांगले बियाणे, भांडवल, खते, जमीन, हवामान, चांगला बाजारभाव, या सर्व बाबींच्या अगोदर शेतमजूर या घटकाला फार महत्व आहे.यांत्रिकीकरण किंवा आधुनिकीकरण कितीही झाले तरी मजुरांशिवाय शेती हा केवळ कल्पनाविलास आहे. कारण जिथे यांत्रिकीकरण झाले तिथे देखील यंत्र चालविण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते काही वर्षापूर्वी शेतमजूर शेतकर्‍याकडे स्वतः कामाची विचारणा करायचा आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकर्‍याला स्वतः, मजुरांना घ्यायला त्यांच्या दारात जावे लागत आहे.

मजूर टंचाईच्या या समस्येमुळे अनेक शेतकर्‍यांनी शेती वाट्याने, खंडाने देणे,इतर व्यवसाय करणे, शेती पडित ठेवणे, कमीत कमी मजुरांची गरज असणार्‍या पिकांची निवड करणे यासारखे प्रकार सुरू केले आहेत. महाराष्ट्रात मुबलक शेतमजूर असणारा एकही भाग आढळत नाही. प्राप्तपरिस्थितीतही कोरोना काळात शेती क्षेत्राच्या जोरावरच आपण देशाची अर्थव्यवस्था टिकवू शकलो हे वास्तव नाकारता येणार नाही.

इतर व्यवसायात तसेच कारखान्यात काम करणार्‍या मजुरांचा आणि मालकांचा किंवा व्यवस्थापकांचा संबंध फक्त कामापुरता आणि व्यवसायिक स्वरूपाचा असतो. परंतु शेतकरी आणि शेतमजूर यांचा संबंध हा अत्यंत घनिष्ठ घरगुती स्वरूपाचा असतो. हे दोन्ही घटक सुख-दुखात एकमेकांना मदत करतात. त्यांच्यात व्यवसायिकता नसून पारिवारिक संबंध जपले जातात शेतमजुरांच्या कामाच्या वेळा अगदी काटेकोर पाळल्या जात नाहीत. शिवाय त्यांच्या कामाचा दर्जा, केलेले काम याचा फारसा विचार शेतकरी करताना दिसत नाही. काही वर्षापूर्वी असणार्‍या महागाईचा तक्ता बघता शेतीमालाच्या दरापेक्षा इतर बाबींचे दर तसेच मजुरीचे दर चांगल्यापैकी वाढले आहेत.

सांगोला तालुक्यासाठी गुड न्यूज, लम्पीच्या ५० हजार लसी मिळणार

 

उपते किंवा टेंडर स्वरूपात काम करणार्‍या मजुरांना मिळणारा रोज हा सुशिक्षित तरूणांपेक्षा जास्त आहे. या सर्वासोबत कायमस्वरूपी काम करणार्‍या मजुरांना त्यांच्या अडीअडचणीत, लग्नकार्य , दवाखाना इत्यादी प्रसंगी शेतकरी त्यांना उचल स्वरूपात आर्थिक मदत करतो. या उचलीचे आकडे साधारण पन्नास हजार ते दीड लाख इतके आढळतात. या प्रकारची उचल देणे कायद्याच्या चौकटीत नसून हे सर्व केवळ विश्र्वासावर चालते.

कित्येक मजूर उचल घेऊन पळून जातात ते परत येत नाहीत. शेवटी शेतकरी पैसे सोडून देतो. एकदरीत पाहता, शेतमजुरांचे पगार वाढवून त्यांना, प्रसंगी उचल देऊन,व कुटुंबाचा घटक अशी वागणूक देऊन देखील बहुतांश शेतमजुरांचे जीवनमान, राहणीमान यात फारसा मोठा बदल झाल्याचे आढळत नाही.मोटार सायकल, अँड्राॅइड फोन, टीव्ही अशा गोष्टी अनेक मजुरांंकडे आले आहेत. मात्र आलेल्या पगाराचे योग्य नियोजन आणि विनियोग त्यांना आजवर जमले नाही किंवा त्यांना कोणी सांगितलं नाही.

अनेकदा शेतमालकांची गरज ओळखून मजुरीचे अव्वाच्या सव्वा दर सांगितले जातात. पैसे घेऊन कामावर न येणे, अर्धवट काम सोडून देणे, उचल घेतलेली रक्कम न देणे, सांगितल्याप्रमाणे काम न करता शेतकर्‍यांचे नुकसान करणे, मद्यपान करून ट्रॅक्टर चालवून अपघात अथवा नुकसान करणे या सर्व बाबी मागील काही शेतमजुरांची मानसिकता ही देशातील शेतीसाठी जशी घातक ठरत आहे.

तसेच वाढत्या मजूरीचे दर हा शेतीतील चिंताजनक विषय ठरला आहे. परिणामी अनंत अडचणीतून जाताना हतबल होणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना आढळत आहेत.

माध्यमांचा प्रपोगंडा!

 

शेतमजूरांच्या अनेक संघटना उदयास आल्या आहेत. शेतमजुरांमध्ये टोकांची अंधश्रद्धा व व्यसनाधिनता आढळते. तसेच धनसंचय न करता व्यर्थ खर्च करण्याची वृत्तीही आढळते. यातून मुक्त का व कसे झाले पाहिजे, शिक्षित का झाले पाहिजे, आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे, इत्यादीबाबींचे प्रशिक्षण या संघटनांनी आपल्या सदस्यांना अर्थात शेतमजुरांना देण्याची खरी आवश्यकता आहे. पण तसे घडताना दिसत नाही. शेतमजुरांच्या संघटना या त्यांच्या उद्धारासाठी नाही तर अप्रत्यक्षात त्यांच्या राजकीय नेत्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या हस्तकाच्या रूपात आपले काम करताना आढळतात.

या प्रकारच्या संघटनांनी शेतमजुरांच्या मनात शेतकर्‍याविषयी चुकुचे गैरसमज वाढवून शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम करत आहेत.ही खरी दुर्देवी शोकांतिका ठरली आहे.

शेतमजूर आणि शेतकरी यांचा संबंध जितका पारदर्शक, प्रामाणिक, जिव्हाळाचा असेल तितका तो शेतीव्यवसायासाठी किंबहुना देशासाठी हिताचा असणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मजुरांच्या पैशाचा व्यवस्थित हिशोब देणे आवश्यक आहे. त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे.

शेकापचा नेता कोण? तालुक्यात प्रचंड संभ्रम

 

गावपातळीवरील कामाचे दर ठरविले पाहिजे. याशिवाय कामाच्या वेळा, पद्धती एकत्रितपणे ठरविल्या पाहिजेत शेतकर्‍यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता, चर्चा करून अनेक बाबी ठरविणे ही खरी काळाची गरज आहे.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका