शेतकऱ्यांनो ऐकलत का? शासनाच्या अनुदानातून करा ड्रॅगनफ्रूट लागवड

हेक्टरी 40 टक्के अनुदानाचा घ्या लाभ, कृषी विभागाचे आवाहन

Spread the love

सोलापूर ( विशेष प्रतिनिधी) : ड्रॅगनफ्रुट (Dragon fruit) या फळाला स्थानिक बाजारपेठेसह राज्य व परदेशातही मोठी मागणी आहे. ड्रॅगनफ्रुटच्या उत्पादनातून शेतकरी मालामाल होत आहेत. ड्रॅगनफ्रुटचे अधिकाधिक उत्पादन वाढवण्यासाठी कृषीविभागाकडून एकूण खर्चाच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

निवडूंग परिवारातील महत्वपूर्ण फळ
ड्रॅगनफ्रुट कमलकन Dragon fruit हे एक निवडूंग परिवारातील अत्यंत महत्वपूर्ण फळ आहे. औषधी गुण, पोषकद्रव्ये याचा विचार करून 2021-22 पासून कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान देण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

सुपर फ्रुट फळाचा दर्जा
ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि ॲन्टीऑक्सीडन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढले
भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्टर चार लाख रूपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरुन 40 टक्क्यांप्रमाणे एक लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.

लागवडीची पद्धत
ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडामध्ये 3 मी. X3 मी., 3 मी X 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सिमेंट काँक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

बहुगुणी व बहुपयोगी ड्रॅगनफ्रुट
ड्रॅगनफ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन (Dragon Fruit) फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.

मूळ मेक्‍सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.

भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक
ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक झाले आहे. मूलतः मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पिक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड कशा प्रकारे केली जाते, याबाबत काही महत्त्वाची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे:

 • एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.
 • हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.
 • ड्रॅगन फ्रूटने सौंदर्यही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेले दिसतात.
 • ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.
 • ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.
 • खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.
 • अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला अटकाव करते. कारण कि फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फ्ल्याच्य सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कि काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.
 • रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीनां रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.
 • माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती निरोगी बनवते.
 • सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या गाळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.
 • ———-

हेही पाहा : काँग्रेसने अण्णासाहेब पाटील महामंडळाचा फायदा मराठा समाजापर्यंत पोहोचू दिला नाही : नरेंद्र पाटील

वृक्षारोपनातून सांगोला तालुक्यात हरित क्रांती शक्य!

सांगोला साखर कारखान्याचे धुराडे लवकरच पेटणार

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका