शेतकरी आंदोलन : मराठी साहित्यिकांची संवेदना मेली आहे काय?

सुनील अभिमान अवचार यांचा खणखणीत लेख

Spread the love
भारतातील काही लोकांनी जे कवी-लेखक-कलावंत आहेत, अशांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अजूनही भरभक्कम असा कुठूनच पाठिंबा दिलेला नाही. ते केवळ प्रतिष्ठेसाठी आपले साहित्य व कला यांचा वापर करण्यात गुंग आहेत. ते कवी-लेखक-कलावंत-खेळाडू हे सर्वजण बेगडी आहेत! मेलेल्या संवेदनेचे लोक आहेत.

 

मराठी भाषेत शेतीवर, मातीत राबणाऱ्या बापावर, मायेवर अत्यंत हळुवार आणि संवेदनशील मनाने लिहिणारे शेकडो कवी-लेखक-कथा-कादंबरीकार आहेत! तसेच, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन तयार करून ते निवेदन व्हॉटस् ॲप ग्रूपवर फिरवणारीही एक अतिसेन्सेटिव्ह गॅंग आहे.

साहित्य अकादमीचे पुरस्कारप्राप्त कवी-लेखक आणि अलीकडच्या काळात पद्मश्रीची माळ ज्यांच्या गळ्यात केवळ एका विशिष्ट विचारधारेचे वाहक म्हणून पडलेली आहे, असे खंडीभर कवी-लेखक या पृथ्वीतलावर जिवंत आहेत.

ग्रेटा थनबर्ग, कमला हॅरिस तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी भाजप पक्षाच्या सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर भारतात संमत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात आपली एक भूमिका घेऊन सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनीही समाजमाध्यमांवरून आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. परंतु भारतातील काही लोकांनी जे कवी-लेखक-कलावंत आहेत, अशांनी या आंदोलनाला अजूनही भरभक्कम असा कुठूनच पाठिंबा दिलेला नाही. ते केवळ प्रतिष्ठेसाठी आपले साहित्य व कला यांचा वापर करण्यात गुंग आहेत. ते कवी-लेखक-कलावंत-खेळाडू हे सर्वजण बेगडी आहेत! मेलेल्या संवेदनेचे लोक आहेत.

१. मराठी मध्यमवर्गीय लेखकांंना दलित, वंचित, शेतकरी-शेतमजुरांचे दुःख हे आपले वाटत नाही.

२. फुले-आंबेडकर-आगरकर यांच्या विचारांपासून ते कोसो दूर आहेत.

३. ब्राह्मणी वर्चस्वाचा मनात भयगंड बाळगून जगणारे हे लोक आहेत.

४. या व्यवस्थेत त्यांचे साहित्यव्यवहार नियंत्रित केले गेले आहेत.

५. पुरोगामीपणाच्या आडून त्यांचे प्रतिगामी व्यवहार सुरू आहेत.

६. पुरस्कार-मान-सन्मानाच्यासाठी ते मिंधे आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवेदना मेलेल्या सर्व कवी-लेखक-कलावंतांना याक्षणी श्रद्धांजली अर्पण करून आपण शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला पाहिजे!

-सुनील अभिमान अवचार
(कवी -चित्रकार)

डॉ. सुनील अभिमान अवचार आंबेडकरवादी कवी-चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’ आणि ‘Our WORLD is Not SALE’, ‘We, the Rejected People of India’ हे अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध असून ते सातत्याने आपल्या कला आणि साहित्यातून शोषणअंताची भूमिका घेत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका