शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अपघातग्रस्तांना केली मदत
- संबंधित बातम्या :
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
- “राजकीय सौहार्दाचा वस्तुपाठ”; हे फक्त सांगोल्यातच घडू शकते
- कै. गणपतराव देशमुख यांच्या आठवणीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात झाले भावूक
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख हे अडलेल्या नडलेल्यांच्या मदतीला नेहमी धावून जात असत. समाजसेवेचा तोच वसा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने दिसून आला. कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या जखमींना त्यांनी तातडीने मदत केली. ते स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना उपचारासाठी दाखल करण्याची तजवीज केली.
त्याचे झाले असे. मंगळवार दि ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०-३० च्या सुमारास डॉ. बाबासाहेब देशमुख हे कोळा येथील क्रिकेट सामन्याच्या उदघाटनासाठी जात असताना हातीद येथील पुलावरती अपघात झाल्याचे दिसले. अपघातग्रस्त कार ही सोलापूरच्या मार्गे तामिळनाडूकडे चालली होती. तर धडक दिलेली कार सोलापूरहून इचलकरंजीकडे चालली होती.
अपघात झाल्याचे लक्षात येताच डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ आपल्या गाडीचे ड्रायव्हर सलीमभाई यांना आपली गाडी थांबवण्यास सांगितले.
दोन भरधाव वाहनांची धडक झालेल्या त्या वाहनातील जखमींना तात्काळ मदत केली. ते स्वत : हा डॉक्टर असलेमुळे त्यांनी प्रथम प्राथमिक तपासणी केली व किरकोळ दुखापत आहे घाबरण्याचे काहीच कारण नाही असा धीर त्या जखमींना दिला. व जखमींच्या नातेवाईकांना सदर अपघाताची हकीकत सांगितली व पुढील उपचारासाठी अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी रवानगी करण्यात आले. काही अडचण आल्यास ताबडतोब मला फोन करा असे सांगून आपला फोन नंबरही त्यांना दिला. या अपघातामध्ये वाहनांचे फार मोठे नुकसान झाले. मात्र ह्या अपघातामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही. जखमी कुटुंब हे तामिळनाडू येथील आहे. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे स्वत : आबासाहेबांच्या समाजसेवेच्या कामाचा आदर्श घेऊन वाटचाल करीत आहेत.