‘शेकाप कार्यकर्त्यांनो, पक्षात फूट पडेल असे वागू नका’
शेकापकडून कार्यकर्त्यांना पत्राद्वारे समज
सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणातील अध्वर्यु भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोल्यातील शेकाप कार्यकर्त्यांत निराशा पसरली असल्याचे दिसत आहे. यातूनच पक्षांतर्गत तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सोशल मीडियातून शेरेबाजी होत आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे पक्षांतर्गत कुरबूर वाढल्याचेही बोलले जात आहे. असे असले तरी भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख यांनी तालुक्यात खेडोपाडी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे सुरु केले आहेत. मात्र काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी शेकापचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
नेमकं काय म्हटलंय प्रसिद्धीपत्रकात?
“स्व.भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेबांवरती जीवापाड प्रेम करणा-या शेकापक्षाच्या परंपरागत नेते व कार्यकर्त्यांना नम्र विनंती. स्व.आबासाहेबांच्या दुःखद निधनाने जे संकट तालुक्यावरती कोसळले आहे त्यातून आपण सावरत आसताना आपल्या पक्षातील मतभेद बसून, चर्चा करुन मिटवले पाहिजेत. पक्ष म्हटले की मत-मतांतर आलेच. परंतु, उगीचच कोणीही कोणाच्या भावना दुखावतील असे शब्दप्रयोग वापरुन पक्षात विनाकारण दरी निर्माण करु नये. आबासाहेबांनी संपूर्ण हयातीत सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन राजकारणाच्या माध्यमातून विकास केला आहे. तीच परंपरा आपण पुढे चालु ठेवली पाहिजे.
आप- आपसात वैयक्तीक टिका-टिपण्णी करणे टाळावे. आपण सगळ्यांनी जात पंथ, धर्म हे बाजूला ठेऊन राजकारण केले पाहिजे, ही स्व. आबासाहेबांची शिकवण आहे. किरकोळ कारणास्तव कोणी वैयक्तीक कोणाला टार्गेट करु नये व कोणी किरकोळ कारणास्थव रागालाही जाऊ नये. दोन्ही बाजू सांभाळाव्यात. स्व.आबासाहेबांनी कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार केली असताना आपापसांत मतभेद नकोत. हे योग्य नाही.
तुम्ही सगळे निष्ठावंत व वैचारिक ठेवण असणारे कार्यकर्ते आहात. पक्ष संघटना मजबूत करण्याचे सोडून हे वेगळेच काय चालले आहे? कोणीही कोणालाही दुखवू नका. आपण सगळे एकत्रित राहिलो तर भविष्य उज्ज्वल आहे.
आपण जात-पात विसरुन एकिने काम केले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी इतरांचा आदर केलाच पाहिजे. पक्षवाढीसाठी आपली ताकद व वेळ दिला पाहिजे. हीच स्व.आबासाहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल.
पक्षाबद्दल प्रेम, आस्था असेल तर पक्षात दरी निर्माण होईल असे मेसेज, स्टेट्स टाळले पाहिजेत, ही विनंती.
– चंद्रकांत सरतापे (प्रसिध्दी प्रमुख शेकाप)”
- हेही वाचा : सांगोला तालुक्यातील रस्ते होणार चकाचक
- हातभट्टीवाल्यांनो, सुधरा.. दुसरा धंदा करा
- शहाजीबापू व दीपकआबांचा लोटेवाडीत भरपावसात सत्कार
- सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
- जगाला हेवा वाटेल असे अहिल्यादेवींचे स्मारक सोलापूरात साकारणार
आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc