शेकापची मशाल धगधगत ठेवणारा खंबीर नेता : ॲड. सचिन देशमुख
जन्मदिन विशेष लेख
स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे
कै. भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी, कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेते ॲड. सचिन देशमुख यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट..
ॲड. सचिन देशमुख यांनी शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर या ठिकाणी आपली वकिलीची पदवी घेतली. या दरम्यान कोल्हापूरमध्ये दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, विष्णुपंत इंगोले, दैनिक पुढारीचे मालक प्रतापसिंह जाधव इत्यादी लोकांसमवेत वेगवेगळी आंदोलने केली.
त्यापैकी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. धनागरे हटाव या आंदोलनात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तो क्षण त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा ठरला. कारण त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना शिष्टमंडळात भेटून निर्णय मान्य करावा लागला.
उपजत नेतृत्वगुण
नेतृत्व गुण उपजतच अंगात असल्याने ॲड. सचिन देशमुख यांना संघर्ष नवा नव्हता. कोल्हापूर लॉ कॉलेजमध्ये परजिल्ह्यातील जीएस होत नव्हता. परंतु 1999 मध्ये प्रथमच परजिल्ह्यातील जीएस ॲड. सचिन देशमुख यांच्या रूपाने पुढे आला.
सामाजिक कार्याची आवड
1998 साली बंधू अशोकराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांनी ॲड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच स्थापना केली. त्या माध्यमातून गावातील तरुणांनी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्यपणे चालू ठेवले.
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर हे चित्र शेतकरी कामगार पक्षामध्ये धूसर होताना दिसत आहे. याबाबतची कुजबुज सातत्याने होताना दिसते. शेकापमध्ये राहूनच समविचारी लोकांना एकत्र करून, आगामी काळात वेगळीच भूमिका मांडणार आहे. सध्याचे नेतृत्व हे न्यायी नाही. कोणालाच न्याय मिळत नाही. हे मी स्वतः बऱ्याच वेळा अनुभवले आहे. सध्या पक्षात जातीय राजकारण केले जात आहे.. सध्याचे नेतृत्वही कामसू नाही, अशी भूमिका ॲड.सचिन देशमुख यांनी घेतली आहे.
23 वर्षांपासून राजकारणात
ॲड. सचिन देशमुख हे 2000 सालापासून राजकारणात आहेत. त्याच वेळी ते low चे शिक्षण कोल्हापुरात घेत होते. घरची कौटुंबिक परिस्थिती पहिल्यापासूनच राजकारणाची. त्यामुळे घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. चुलते स्व.बाबासाहेब देशमुख व रामचंद्रदादा देशमुख यांनी लोकल बोर्डासह अनेक पदावरती यांनी काम केले होते. त्यानंतर ॲड.सचिन देशमुख हे गणपतराव देशमुख यांच्या संपर्कात आले. याचवेळी सचिन देशमुख यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेत योगदान दिले.
महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेच्या प्रचारासाठी तालुकाभर दौरे केले. 2019 च्या विधानसभा निवडणूकी वेळीही आबासाहेबांनी कामाला लागा, असे सांगितले होते. पण त्यावेळीही त्यांनी माघार घेतली.
आबासाहेबांचे मार्गदर्शन
स्वर्गीय आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख यांच्याबरोबर सन 2000 पासून ॲड. सचिन देशमुख यांनी कामास सुरुवात केली. ॲड. सचिन देशमुख यांच्यावर कायम भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा पगडा होता. प्रत्येक राजकीय निर्णय घेताना आबासाहेब स्वतः सचिन देशमुख यांना बोलवून घेत असत. भाई गणपतराव देशमुख यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता. तो विश्वास ॲड. सचिन देशमुख यांनी सार्थ करून दाखविला.
2019 च्या विधानसभेचा उमेदवार आबासाहेब नाहीत म्हटल्यावर सचिन देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या भूमिकेला पक्षातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, ॲड. सचिन देशमुख यांनी शेकापची उमेदवारी भाई गणपतराव देशमुख यांच्या घरातील व्यक्तीलाच द्यावी अशी जाहीर भूमिका घेतली.
माणदेश महाविद्यालयाची स्थापना
कोळे परिसरातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय नव्हती. म्हणून जुनोनी येथे लोकनेते मारुती आबा बनकर यांना घेऊन माणदेश महाविद्यालयाची स्थापना केली. सध्या ते खजिनदार या पदावर आहेत.
त्यानंतर 2017 साली ॲड. सचिन देशमुख हे जि. प. सदस्य झाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झाले. आटपाडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. स्वर्गीय किसनराव कोळेकर यांच्या मृत्यूनंतर लोकनेते किसनराव कोळेकर पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. महिलांना रोजगार मिळावा म्हणून गारमेंटची सुरुवात केली. 200 महिलांना रोजगार दिला.
परंतु नोटाबंदीच्या काळात हे गारमेंट बंद पडले. आबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नोकर भरती मेळावा घेऊन शेकडो युवकांना नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न केला. गरिबांना सहकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाधान मेळावा आयोजित केला. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे उपस्थित होते.
मोठे सामाजिक कार्य
कोरोना काळात ॲड. सचिन देशमुख यांनी स्वतः आरोग्य टीम आशा वर्कर यांना घेऊन भीतीच्या लाटेत लोकांना आधार देण्यासाठी घरोघरी मोफत औषध गोळ्या वाटप केले. तसेच कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम केले म्हणून सर्वांना अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, डॉक्टर, पोलीस, आशा वर्कर, सफाई कामगार, ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार, तहसीलदार यांचा सन्मान केला.
अस्थिविहाराचे काम पूर्ण
कोळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय भव्य दिव्य असे अस्थिविहार बांधण्यासाठी जिल्हा परिषदमधून दोन कोटी रुपये निधी मंजूर केला. स्वतः लक्ष घालून ॲड. सचिन देशमुख यांनी हे काम मार्गी लावले. हे अस्थिविहार बांधून पूर्ण झाले असून एका सुंदर प्रेरणादायी वास्तूमुळे तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेले हे जिल्ह्यातील एकमेव विहार असावे.
ॲड. सचिन देशमुख यांनी गटातील प्रत्येक गावात विकास कामासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला. प्रत्येक शाळेत हायस्कूलमध्ये मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर फिल्टर देण्यात आलेत.
स्वर्गीय बाबासाहेब देशमुख हे सचिन देशमुख यांचे चुलते आहेत त्यांच्या विचाराचा वारसा ॲड. सचिन देशमुख हे पुढे चालवत आहेत.
ॲड. सचिन देशमुख यांनी कोळा जिल्हा परिषद गटात 30 कोटी रुपयांहून अधिक रुपयाची कामे केली आहेत. कोरोना काळात उत्तम सेवा देणाऱ्या सर्वांचा त्यांनी येथोसत्कारही केला आहे. हेच निष्कलंक, चरित्रसंपन्न, स्पष्ट बोलणारे, गरिबांना न्याय देणारे असे कणखर असे व्यक्तिमक्त आहे.
पक्षाकडून मात्र बेदखल
अनेक वर्षांपासून ॲड. सचिन देशमुख यांनी अत्यंत निष्ठेने शेतकरी कामगार पक्षाचे काम केले आहे. भाई गणपतराव देशमुख हयात असताना त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ॲड. सचिन देशमुख यांनी काम पाहिले आहे. प्रत्येक राजकीय निर्णय प्रक्रियेत ॲड. सचिन देशमुख यांचा महत्त्वाचा रोल असायचा. भाई गणपतराव देशमुख हे कार्यकर्त्यातील समर्पण भाव ओळखायचे. त्याला बळ द्यायचे.
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर हे चित्र शेतकरी कामगार पक्षामध्ये धूसर होताना दिसत आहे. याबाबतची कुजबुज सातत्याने होताना दिसते. शेकापमध्ये राहूनच समविचारी लोकांना एकत्र करून, आगामी काळात वेगळीच भूमिका मांडणार आहे. सध्याचे नेतृत्व हे न्यायी नाही. कोणालाच न्याय मिळत नाही. हे मी स्वतः बऱ्याच वेळा अनुभवले आहे. सध्या पक्षात जातीय राजकारण केले जात आहे.. सध्याचे नेतृत्वही कामसू नाही, अशी भूमिका ॲड.सचिन देशमुख यांनी घेतली आहे.
आगामी काळात पक्षात राहूनच समविचारी लोकांना एकत्र आणून पक्ष बळकटीसाठी कार्य करण्याचा संकल्प ॲड. सचिन देशमुख यांनी केला आहे.