शेकापची गटबाजी अन् निवडणूक प्रतिष्ठेची
अनकढाळ ग्रामपंचायत; एकाच कुटुंबातील चार उमेदवार
सांगोला/ नाना हालंगडे
अनकढाळ ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ५५ वर्षे शेकापचे वर्चस्व असल्याने निवडणुका बिनविरोध होत आल्या होत्या. मात्र, 99 वर्षांच्या राजकारणात यंदा गटबाजीमुळे गावात शेकापमध्ये बंडखोरी झाली अन् सरपंच पदासाठी शेकापक्षाच्या तीन उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष यांच्यात पंचरंगी लढत होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीचा फिवर चढू लागला आहे. सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये या निवडणुका होत आहेत. प्रचाराने धुरळा उडवून दिला आहे.
सदस्य पदासाठी पती-पत्नीसह त्यांची दोन मुले वेगवेगळ्या प्रभागात तर पती-पत्नी सरपंच व सदस्य पदासाठी चार ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सोलापूर- सांगली महामार्गाशेजारी व माण नदीच्या काठावर वसलेल्या अनकढाळ ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली झाली. स्थापनेनंतर काँग्रेस (आय) विरुद्ध शेकाप पक्षात सन १९६२ ते १९७२ अशा दोनवेळा पंचवार्षिक निवडणुका झाल्या.
१९७२ पासून ते २०१७ पर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध केल्या. बिनविरोध निवडणुकीमुळे शेकापची सत्ता अबाधित राहिली आहे. त्यामुळे दर पाच वर्षांसाठी या सात वाड्यांपैकी आलटून पालटून एकाला सरपंच तर त्यामध्ये दोन्हीही वेळा शेकापलाच दुसऱ्याला उपसरपंच वाटून घेतले जात सत्ता मिळाली. त्यानंतर सुब्राव बंडगर होते.
हनुमंत बंडगर या चुलत बंधूनी सक्रिय मात्र, सन २०१७ मध्ये शेकाप राजकारणात सहभागी होऊन सन पक्षात दोन गट पडल्यामुळे ४९ वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित झाली. सन २०१७ मध्ये शेकापमध्ये बंडखोरी झाली अन् दोन गटांत निवडणूक झाली. मात्र, शेकापला सत्ता मिळाली, असा अनकढाळ ग्रामपंचायतीचा राजकीय प्रवास राहिला आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधून भालचंद्र अण्णासाहेब बंडगर व सुनीता भालचंद्र बंडगर पती-पत्नी सदस्य पदासाठी नशीब आजमावत आहेत.