थिंक टँक / नाना हालंगडे
निष्कलंक आणि विकासाभिमुख राजकारण करून राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षात नेतृत्वावरून मोठा संभ्रम दिसून येत आहे. शेकापचा नेता कोण? अनिकेत की बाबासाहेब? हा प्रश्न सध्या शेकाप कार्यकर्त्यांकडून चर्चिला जात आहे.
दोन वेळचा अपवाद वगळता सलग अकरा पंचवार्षिक निवडणुका जिंकून माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी देशात विक्रम प्रस्थापित केला होता. मागील वर्षी त्यांचे निधन झाल्याने शेकापमध्ये पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी राजकारणात सक्रिय होऊन पुढाकार घेतला.
Although there is peace from above in the SKP, it is a smoldering peace from within. Interestingly, two and a half years after the assembly elections, the question is being raised that why did Aniket Deshmukh remember the visit to the village only now?
डॉ. अनिकेत देशमुख हे भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीत शेकापचे विधानसभेचे उमेदवार म्हणून लोकप्रिय झाले असल्याने त्यांना ओळखणारा तुलनेत मोठा वर्ग सांगोला तालुक्यात दिसून येतो. दरम्यानच्या काळात भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सक्रिय झाले.
कार्यकर्त्यांत संभ्रम
डॉ. अनिकेत देशमुख यांनी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्या नोकरी आणि करिअरला प्राधान्य दिले. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सर्व सोडून सांगोला तालुक्यातील समाजकारण, राजकारणात सक्रिय होणे पसंद केले. संभ्रमाची सुरुवात येथूनच झाली.
भाईंची हुबेहूब छबी
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपले आजोबा भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत अहोरात्र मेहनत करून जनसंपर्क वाढविला. साधे राहणीमान आणि सौजन्यशील वर्तनातून त्यांनी शेकापच्या तरुण आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना आपलेसे केले. भाषाशैली आणि वर्तन हे हुबेहूब भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखे असल्याने लोक त्यांना प्रती आबासाहेब समजू लागले.
नेमका नेता कोण?
अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांना मानणारा वेगवेगळा गट तयार झाला आहे. अनिकेत देशमुख हेच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील असा एकतर्फी प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे बाबासाहेब देशमुख यांचे कार्यकर्तेही बाबासाहेब देशमुख यानाच मोठा जनाधार असल्याचे सांगत शांतपणे रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहेत.
A different group has formed which respects Aniket Deshmukh and Babasaheb Deshmukh. A one-sided campaign is going on that Aniket Deshmukh will be the candidate in the upcoming assembly elections.
अनिकेत देशमुख यांचा अचानक गावभेट दौऱ्याचा सपाटा
डॉ. बाबासाहेब देशमुख यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते मागील काही दिवसांपासून विश्रांती घेत आहेत. या काळात ते सार्वजनिक रित्या फिरत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच डॉ. अनिकेत देशमुख आणि त्यांचे वडील चंद्रकांत देशमुख यांनी सांगोला तालुक्यात गावभेट दौऱ्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते तापले असल्याचे दिसून येत आहेत.
धुमसणारी शांतता
भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी बाबासाहेब देशमुख यांच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबत सकारात्मक सूतोवाच केल्याचे दिसताच अनिकेत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीचा मुद्दा लावून धरला. सध्या या दोन्हीही भावांचे समर्थक आपलाच नेता कसा योग्य आहे, तोच विधानसभा निवडणुकीत उमेदवार असेल याची प्रसिध्दी सुरू केली आहे.
शेतकरी कामगार पक्षात वरून शांतता दिसत असली तरी ही आतून धुमासणारी शांतता आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल अडीच वर्षांनी अनिकेत देशमुख यांना गावभेट दौऱ्याची आताच का आठवण झाली असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसऱ्या फळीतील नेत्यांची चुप्पी
शेतकरी कामगार पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेतेही या प्रकरणात बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. दोघा भावांतील हा नेतृत्वाचा वाद मिटविणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
बाबासाहेब देशमुख आज सांगोल्यात
आजारातून बरे झाल्यानंतर बाबासाहेब देशमुख हे रविवारी सकाळी सांगोला येथे येत आहेत. त्यांच्या स्वागताचे जंगी नियोजन करण्यात आल्याचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या वातावरणावर बाबासाहेब देशमुख कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाहा खास व्हिडिओ