ताजे अपडेट
Trending

शिवाजी महाविद्यालय युवा महोत्सवाचा मानकरी

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या युवा महोत्सवाचा मानकरी बार्शीचे शिवाजी महाविद्यालय ठरले. द्वितीय क्रमांक संगमेश्वर कॉलेज सोलापूर, तर तृतीय क्रमांक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी पटकाविला. बुधवारी दुपारी सुप्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

सांगोल्याची तृप्ती गोल्डन गर्ल तर बार्शीचा सुरज गोल्डन बॉय.. युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी सांगोला कॉलेज सांगल्याची तृप्ती बेंगलोर कर तर गोल्डन बॉयचा किताब बार्शीच्या शिवाजी कॉलेजचा सुरज काळे यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

रिंकू राजगुरू म्हणाली की, विद्यार्थ्यांनी कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच आपल्या करिअरची वाट निश्चित करावी. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा. तेथे परिश्रमाशिवाय पर्याय नाही. एखादी घटन तुमच्या आयुष्याला कलाटणी देत असते.

गोल्डन गर्ल
गोल्डन बॉय

 

माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील

 

यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू, खा. धनंजय महाडिक, कुलसचिव डॉ. योगिनी घारे, प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शाह, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. यशपाल खेडकर, डॉ. गुणवंत सरवदे, डॉ. सुभाष कदम आदी उपस्थित होते.

 

शिवाजी महाविद्यालय बार्शी
संगमेश्वर कॉलेज सोलापूर
शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज

 

निकाल पुढीप्रमाणे
मातीकाम : प्रथम क्रमांक शिवाजी महाविद्यालय बार्शी व सांगोला महाविद्यालय सांगोला (विभागून)
व्यंगचित्र स्पर्धा प्रथम क्रमांक: दयानंद महाविद्यालय

भित्तीचित्रण : प्रथम : संगमेश्वर कॉलेज सोलापूर,
द्वितीय : शंकरराव कॉलेज व
दयानंद लॉ कॉलेज सोलापूर
तृतीय : वालचंद कॉलेज सोलापूर

स्थळ चित्रण :
प्रथम : शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
द्वितीय : संगमेश्वर कॉलेज व वालचंद कॉलेज सोलापूर
तृतीय : दयानंद कॉलेज सोलापूर, शिवाजी महाविद्यालय बार्शी

स्पॉट फोटोग्राफी
प्रथम : शिवाजी महाविद्यालय बार्शी
द्वितीय : संगमेश्वर कॉलेज सोलापूर, दयानंद कॉमर्स कॉलेज सोलापूर
तृतीय : दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, दयानंद लॉ कॉलेज

निर्मिती चित्र स्पर्धा
प्रथम : शिवाजी महाविद्यालय बार्शी
द्वितीय : केबीपी कॉलेज पंढरपूर, डी जी एफ दयानंद कॉलेज सोलापूर, सांगोला महाविद्यालय
तृतीय : संगमेश्वर कॉलेज सोलापूर, कस्तुरबाई, वसुंधरा कॉलेज सोलापूर

शास्त्रीय नृत्य प्रथम क्रमांक संगमेश्वर कॉलेज सोलापूर
शास्त्रीय तालवाद्य :
प्रथम : शिवाजी महाविद्यालय बार्शी
द्वितीय : शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
तृतीय : दयानंद कॉलेज सोलापूर

शास्त्रीय सूरवाद्य
प्रथम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधीविभाग
द्वितीय : शिवाजी महाविद्यालय बार्शी
तृतीय : दयानंद कॉलेज सोलापूर

शास्त्रीय गायन
प्रथम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग
द्वितीय : हिराचंद नेमचंद कॉलेज सोलापूर
तृतीय : शिवाजी महाविद्यालय बार्शी

सुगम गायन
प्रथम : हिराचंद नेमचंद कॉलेज सोलापूर
द्वितीय : संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा
तृतीय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग

समूह गीत
प्रथम : संगमेश्वर कॉलेज सोलापूर
द्वितीय : डीबीएफ दयानंद कॉलेज सोलापूर
तृतीय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग

फोक ऑर्केस्ट्रा
द्वितीय : शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
तृतीय : शिवाजी कॉलेज बार्शी

पथनाट्य
द्वितीय : दलितमित्र कॉलेज मंगळवेढा, सोशल कॉलेज सोलापूर
तृतीय : विभागून – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधीविभाग व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज

मुकनाट्य
प्रथम : शंकरराव कॉलेज अकलूज
द्वितीय : बुर्ला महिला महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, बार्शी
तृतीय : वालचंद कॉलेज सोलापूर, सोशल कॉलेज सोलापूर

लघुनाटिका
प्रथम : वसुंधरा कॉलेज सोलापूर, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
द्वितीय : सांगोला महाविद्यालय सांगोला, शिवाजी महाविद्यालय बार्शी
तृतीय : माणदेश महाविद्यालय जुनोनी, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा

वैयक्तिक
नकला :
१: शिवाजी कॉलेज बार्शी
२: सोशल महाविद्यालय सोलापूर
३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग

एकांकिका
१: शिवाजी महाविद्यालय बार्शी
२: छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर व संगमेश्वर कॉलेज सोलापूर
३: सांगोला महाविद्यालय, माणदेश महाविद्यालय जुनोनी

मंच संयोजन
१: छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर
२: शिवाजी महाविद्यालय बार्शी
३:दयानंद कॉलेज सोलापूर

(बातमी अपडेट होत आहे.)

‘बच्चन’ व्हायचंय का तुम्हाला?

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका