शिवणेत जिल्हा बँक फोडली, सात लाखांची रोकड लंपास
सांगोला/ नाना हालंगडे
ऐन दीपावलीच्या तोंडावर सांगोला तालुक्यात शिवणे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी लूटली. यामध्ये ७ लाखावर डल्ला मारला तर बँकेतील कागदपत्रे जाळून टाकली.
शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या सहायाने खिडकीचे गज कापून प्रवेश केला. तिजोरी फोडून ७ लाखाची रोकड लंपास केली. बँकेतील महत्वाची कागदपत्रे जाळली. ही घटना सकाळी निदर्शनास आली. श्वान पथक मागवण्यात आले. सुगावा लागला नाही.