शिक्षक समिती ही चांगुलपणाला प्रेरणा देणारी चळवळ : अनिल कादे

सांगोला शिक्षक समितीचा गुणगौरव सोहळा

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमात यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करुन प्राथमिक शिक्षक समितीने चांगुलपणाला चालना देणारी चळवळ गतिमान केल्याचे गौरवोदगार शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी काढले.


शिक्षक समिती सांगोला तालुका शाखेच्या वतीने आयोजित गुणगौरव सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कादे यांनी बालके, शिक्षक व पालक या सर्व घटकांतील चांगुलपणा शोधून सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून सन्मानित करीत शिक्षक समितीने हा चांगुलपणा समाजासमोर आणला आहे. हा गौरव अधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरक ठरेल अशा शब्दांत तालुका शाखेचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षक समितीचे नेते राजेंद्र नवले, सुरेश पवार, अमोघसिद्ध कोळी, सुनिल कोरे, दत्तात्रय पोतदार, एकनाथ जावीर, भारत लवटे, हमजूभाई मुलाणी,सिंहगड इन्स्टिट्युटचे अशोक नवले, केंद्रप्रमुख बाळासाहेब इंगवले इ.प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


यावेळी शिक्षक समितीचे माजी राज्य संपर्क प्रमुख सुरेश पवार यांनी शिक्षकांना चिंतामुक्त ठेवण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात आलेल्या विषयांची माहिती देतानाच जिल्हा स्तरावर शिक्षक समितीने पाठपुराव्यासाठी हाती घेतलेल्या विषयांची माहिती दिली . गुणीजनांच्या गौरव सोहळ्यातून मिळणाऱ्या प्रेरणेमुळे तालुक्याच्या गुणवत्ता वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी गुणवंत विद्यार्थी, नूतन मुख्याध्यापक तसेच निबंध व स्वच्छ – सुंदर शाळा पुरस्कार योजनेतील यशस्वी शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘विजेने चोरलेले दिवस’ या पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक संतोष जगताप व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नूतन पदाधिकारी कृष्णा पवार, धनंजय धबधबे, धनाजी खंडागळे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमती राजश्री कोरे, वनिता जाधव, आण्णासो लेंडवे, रायबाण सर यांनी गौरवमूर्तींच्या वतीने मनोगते व्यक्त केले. शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून अंबिका शिंदे व सुनिता खंकाळ मॅडम यांच्या निवडी करण्यात आल्या.त्यांना जिल्हाध्यक्ष अनिल कादे, सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांच्या हस्ते गौरव करुन नियुक्ती पत्रे देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष भारत लवटे यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत भागवत भाटेकर,मुरलीधर गोडसे, राजेंद्र माने, आनंदा बामणे, बशीर मुलाणी, अशपाक इनामदार, गंगाधर जुंदळे, प्रमोद इंगोले,राहुल चंदनशिवे, पतंगराव बाबर, राजाराम बनसोडे, गोरख बनसोडे,संतोष ननवरे,रमजान तांबोळी, संजय बनसोडे, बाबासाहेब कबाडे, सचिन चांडोले, सचिन गरंडे, रामचंद्र तंडे, सिध्दनाथ धुकटे, श्रीमती नयना पाटील ,अलका कोल्हे, सरला खाडे, शारदा सरगर, सुवर्णा पाटील, संगिता केसकर, स्वाती घोंगडे, माधुरी जुंदळे, सुनिता देसाई,शितल गुरव, वर्षा बनकर,ज्योती जाधव यांनी केले.

सूत्रसंचालनसिताराम बुरांडे व संतोष कांबळे यांनी केले तर आभार सरचिटणीस भागवत भाटेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका