शिंदेवस्ती येथे अखेर मिनी अंगणवाडीस मान्यता

जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांचे प्रयत्न

Spread the love

सांगोला : सांगोला अंतर्गत मौजे वाकी (घेरडी) ता. सांगोला येथील शिंदे वस्ती येथे मिनी अंगणवाडी कार्यान्वित करण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती जि. प. सदस्या तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात 16 प्रकल्प मंजूर असून सदर प्रकल्पांतर्गत 3269 मोठी अंगणवाडी केंद्रे व 945 मिनी अंगणवाडी केंद्रे अशी एकूण 4214 अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत. तथापि प्रकल्प कुर्डुवाडीमधील एक मिनी अंगणवाडी केंद्र व प्रकल्प टेंभुर्णीमधील दोन मिनी अंगणवाडी केंद्र आजअखेर कार्यरत नसून त्याचे अन्य ठिकाणी स्थानांतरण करण्याबाबत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी या कार्यालयास कळविले होते. उपरोक्त संदर्भ अन्वये कार्यरत नसणारे मिनी अंगणवाडी केंद्र आवश्यकता प्रमाणे प्रकल्प मोहोळ, प्रकल्प मंगळवेढा, प्रकल्प सांगोला या ठिकाणी स्थालांतर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. या बाबत आयुक्त यांनी कार्यरत नसणाऱ्या मिनी अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्यास मान्यता दिली.

मौजे वाकी (घेरडी) ता. सांगोला अंतर्गत सध्या निमंग्रेवाडी, माळीमोटे दाईंगडे वस्ती येथे मिनी अंगणवाडी सुरु असून गावठाण व खांडेकर वाडी येथे मोठ्या अंगणवाडी आहेत. परंतु गेली अनेक वर्षे शिंदेवस्ती येथे अंगणवाडी नाही. त्यामुळे तेथील लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे या पूर्वी अनेक वषे लोकवर्गणीतून या ठिकाणी मिनीअंगणवाडी प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. याबाबत शिंदेवस्ती येथील ग्रामस्थ पदाधिकारी यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी जि. प. अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती. विद्यमान सरपंच सौ.अर्चनाताई बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक वाघसाहेब अंगणवाडी सेवीका शिंदे, लाडाबाई खांडेकर, लतिका घेरडे, लवटे मँडम यांनी योग्य माहितीसह प्रस्ताव आतार मँडम, टकले साहेब व सुपरवायझर वाकी घेरडी बीट यांच्याकडे सादर करून सदर प्रस्ताव प्रकल्प सांगोला अंतर्गत जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेकडे जावेद शेख यांच्याकडे सादर करण्यात आला.

लहान मुलांची गैरसोय व शिंदेवस्ती ते गावठाण अंतर या बाबत जि. प. सदस्य स्वातीताई कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलिप चव्हाण, सभापती स्वातीताई शटगार, विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्याकडे पाठपुरावा करून सदर ठिकाणी मिनी अंगणवाडी सुरु करण्यासाठी मान्यता घेतली. सदर ठिकाणी मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता मिळाल्याने शिंदेवस्ती ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिनी अंगणवाडी चालवून माजी आमदार दीपकआबा-साळुंखे पाटील, माजी जि. प. अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, विद्यमान जि.प. सदस्या स्वातीताई कांबळे यांचा विश्वास सार्थ ठरवू असे मनोगत व्यक्त केले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका