शहाजीबापू व दीपकआबांचा लोटेवाडीत भरपावसात सत्कार

सांगोला उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ, मुसळधार पावसात काढली मिरवणूक

Spread the love

सांगोला : सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या १४ गावांसाठी वरदायीनी असलेल्या ”सांगोला उपसा सिंचन योजना” या योजनेच्या ड्रोन सर्वेक्षण कामास लोटेवाडीत शनिवारी सुरुवात झाली. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, भाऊसाहेब रूपनर यांची भरपावसात जंगी मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ”सांगोला उपसा सिंचन योजना” याचे ड्रोन कॅमेरा पद्धतीने सर्वेक्षण कामाचा शुभारंभ लोटेवाडी ता.सांगोला येथे शनिवारी सायं.४:०० वाजता आयोजिला होता. यानिमित्त लोटवाडी येथील जनतेने आमदार शहाजीबापू व दीपकआबा यांचा ऐतिहासिक सत्कार केला.

या उपसा सिंचन योजनेत समावेश असलेल्या 14 गावातील नागरिकांची उपस्थिती होती. सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील व भाऊसाहेब रुपनर यांचं जंगी स्वागत करून सत्कार केला. भरपावसात हा कार्यक्रम झाला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका