ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात, एकजण जागीच ठार

Spread the love

आम.शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांनी संरक्षक गाडी होती.

थिंक टँक / नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला चुकीच्या दिशेने येवून दुचाकी धडकली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात माळवाडी, नाझरा (ता. सांगोला) येथे थोड्यावेळापूर्वी घडला आहे.

दुचाकीवरील मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम एच ४५ ए जे ६३३० असा आहे.

अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीने पोलिसांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने एकाचा तडफडून मृत्यू झाला. दुचाकीच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

आम.शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांनी संरक्षक गाडी होती.

त्यांचा ताफा माळवाडी, नाझरा (ता. सांगोला) येथे आला असता त्याच आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकीस्वार येवून चढल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त वाहन.

पोलिस गाडीचा क्रमांक एम एच १४ डी एम ९४४० असा आहे. अपघातातील जखमीस उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदार शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील वजनदार नेते आहेत. गुवाहाटी येथे त्यांनी “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” हा डायलॉग म्हटला आणि ते देशभरात फेमस झाले. केवळ या डायलॉगमुळेच नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांवर ते सातत्याने टीकेची झोड उठवत असतात. त्यामुळेही ते सतत चर्चेत असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातील नाझरा येथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी आमदार शहाजी पाटील हे गेले होते. तेथे उद्घाटन सोहळा आटोपून आमदार शहाजी पाटील हे सांगोला शहराकडे येत असताना यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाला.

दरम्यान हा अपघात घडताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

(बातमी अपडेट होत आहे)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका