
थिंक टँक / नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..”फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी होत असते. सिने कलाकारांनाही शहाजीबापू पाटील यांची भुरळ पडली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि आ. शहाजीबापू पाटील यांची मुंबईत नुकतीच भेट झाली. या भेटीत दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या.
या भेटीची छायाचित्रे आ. शहाजीबापू पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या भेटीबाबत आमदार शहाजीबापू पाटील म्हणतात की, “मुंबई येथे सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची एका कार्यक्रमप्रसंगी भेट झाली. जॅकी श्रॉफ यांचा मी खूप वर्षापासूनचा फॅन राहिलोय. त्यामुळे त्यांची प्रत्यक्षात भेट झाल्यावर खूप आनंद झालाच. शिवाय त्यांच्या चित्रपटातील आवडलेल्या व सदैव स्मरणात ठेवलेल्या किस्स्यांवरून चांगलीच चर्चा रंगली.
लग्न सोहळ्यात बापूंचीच हवा
मागील दोन ते तीन महिन्यांपासून तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये झालेल्या अनेक लग्न सोहळ्यात आ. शहाजीबापू नववधू-वरांना आशीर्वाद देताना दिसून आले. गावोगावच्या लग्न सोहळ्यांमध्ये शहाजीबापू पाटील यांना आमंत्रित केले जात आहे. आ. शहाजीबापू पाटील हे आपल्या गावात येतात म्हटल्यावर या लग्न सोहळ्याची चर्चा होताना दिसते. विवाह सोहळे, भूमिपूजन, दुकानांचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांमध्ये शहाजीबापू पाटील यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.
महाराष्ट्रभरातील अनेक शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांना आमंत्रित केले जात आहे. ते जिथे जातील तेथे हजारोंची गर्दी जमते असा आयोजकांचा अंदाज असतो. शहाजी बापूजी पाटीलही अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात. आपल्या खुमासदार आणि रांगड्या भाषणातून ते उपस्थितांना मनसोक्तपणे हसवतात. राजकीय भाष्य करतात. त्यांच्या या भाषणाची प्रसार माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असते. त्यामुळेच शहाजी बापू पाटील यांची लोकप्रियता राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
सुषमा अंधारे यांना काय प्रत्युत्तर देणार?
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगोला येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर कठोर टीका केली आहे. शहाजीबापू पाटील हे एक एकर जागेत बंगला बांधत आहेत. त्यांच्याकडे असं कुठलं झाड आहे की चार महिन्यात त्यांच्या हातात पैसा खेळू लागला? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय वसंत दादा पाटील प्रस्तावित सूतगिरणी तसेच पतंगराव कदम मल्टीस्टेट बँक या संस्थांतील व्यवहाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आमदार शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जास्त काळ राहणार नाहीत. शिंदे गटाचे अनेक आमदार हे भाजपमध्ये जातील. तेव्हा उडी मारणारे पहिले आमदार हे शहाजीबापू पाटील असतील असे म्हणत सुषमा अंधारे यांनी बॉम्ब टाकला होता.
सुषमा अंधारे यांच्या सभेमुळे शहाजीबापू पाटील यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अंधारे यांच्या या टीकेला शहाजी बापू पाटील कसे प्रत्युत्तर देतात याची सर्वांना उत्सुकता आहे.
कोण आहेत जॅकी श्रॉफ
जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला. असे म्हटले जाते की जॅकी यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली आणि म्हणूनच त्यांचे नाव जग्गू दादा ठेवण्यात आले. चाळीतले सगळे त्यांना याच नावाने हाक मारायचे. गरिबीमुळे जॅकींना अकरावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधावी लागली. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, त्यामुळे ते ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले होते पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाही.
इ.स. १९७३ साली त्यांनी हीरा पन्ना या हिंदी चित्रपटातल्या छोट्याश्या खलनायकी व्यक्तिरेखेद्वारे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर इ.स. १९८२ सालातल्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे याने चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. त्यानंतर इ.स. १९८३ सालच्या हीरो चित्रपटाने याला मोठे नाव मिळवून दिले. तेव्हापासून २८ वर्षांत (इ.स. २०११पर्यंत) याने दीडशेंहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
अनेक दिवस नोकरीच्या शोधात भटकल्यानंतर एक दिवस जॅकी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभे होते, तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून, ‘तुला मॉडेलिंगमध्ये रस असेल का?’ असे विचारले. प्रत्युत्तरात जॅकी म्हणाले की, ‘तुम्ही पैसे द्याल का?’ जग्गू दादाहून जॅकी श्रॉफ होण्याचा प्रवास इथून सुरू झाला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि जॅकी रातोरात सुपरस्टार झाले.
‘हीरो’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जॅकी यांचे लाखो चाहते होते. त्याचवेळी प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला जॅकी यांनी आपला चित्रपट साईन करावा असे वाटत होते, त्यासाठी मोठे दिग्दर्शक त्यांच्या घरी जायचे. एक वेळ अशीही होती की, जॅकी बाथरुममध्ये असेल तरी निर्माता-दिग्दर्शक बाथरूमच्या बाहेर उभे राहून त्यांच्या चित्रपटात अभिनेत्याला घेऊन जाण्याची वाट पाहत बसायचे.
झगमगत्या दुनियेत आलेल्या जॅकी यांनी गरिबी आणि दुःख काय असतं ते पाहिलं होतं. कदाचित त्यामुळेच ‘हीरो’ चित्रपट हिट झाल्यानंतरही जॅकी यांनी चाळीत राहणं कधी सोडलं नाही. वर्षानुवर्षे ते असेच राहिले. त्याच चाळीत त्यांच्या काही चित्रपटांचं चित्रीकरणही झालं होतं.
अभिनेत्याने १९८७ मध्ये आयशासोबत लग्न केलं. आयशा एका उच्चभ्रू कुटुंबातील होत्या. मात्र जॅकी यांच्यासाठी आयशा यांनी चाळीत राहण्यास होकार दिला. त्यांना टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ ही दोन मुलं आहेत. टायगरही बॉलिवूड अभिनेता असून त्याचे स्टंट आणि स्टाईल लोकांना आवडते.
हेही पाहा