विधानसभागृहासमोर उभारणार भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळा
पुतळा कमिटीवर डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोला : विशेष प्रतिनिधी
स्व.गणपतराजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांचा पुतळा विधानसभागृहाच्या आवारात उभा करण्यास विधानसभेची मंजुरी कालच मिळाली असून,याच पुतळा कामिटीवर स्व. आबासाहेबांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना घेण्यात आले,असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.फडणवीस यांनी सांगितले.
सांगोला तालुक्याच्या अभिमानाची गोष्ट असून,55 वर्षे नेतृत्व करणाऱ्या भाईंच्या कार्याचा हा गौरव आहे.असे
आघाडी सरकारच्या काळात मा.ऊध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री व अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यावेळचे विरोधी पक्षनेते पदी असलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांचा पुतळा विधानसभागृहाच्या आवारात उभा करण्याची मागणी केलेली होती.
सध्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विराजमान झालेले आहेत.
सध्या विधानसभेचे पाऊसाळी अधिवेशन सुरू असुन स्व आबासाहेबांच्या पुतळा सभागृहाच्या आवारात उभे करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.
स्वता आ.भाई जयंत पाटील यांनी वरच्या सभागृहात माहीती दिली तर खालच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहीती दिली.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व आ.जयंत पाटील यांनी पुतळा कमेटीवरती आबासाहेबांचे नातु बाबासाहेब देशमुख यांना घेण्याचेही जाहीर केले.