विद्यापीठातील भाषा संकुलात नेट, सेट कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा विषयाच्या नेट सेट कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू,पाली, प्राकृत, संस्कृत, आणि कन्नड या विषयातील तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषा व वाड्.मय संकुलाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नेट-सेट परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी भाषा व वाड्.मय संकुलाने ऑनलाइन नेट सेट कार्यशाळेचे आयोजन केले होते. दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर रोजी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
दोन दिवस चाललेल्या कार्यशाळेत दोन सत्रांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू,पाली, प्राकृत, संस्कृत, आणि कन्नड या विषयातील तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मराठी विषयाचे तज्ञ म्हणून डॉ. नामदेव शिंदे, प्रा. नानासाहेब गव्हाणे, हिंदी विषयाचे तज्ञ डॉ. सुचिता गायकवाड, डॉ. मालोजी जगताप, इंग्रजी विषयाचे प्रा. राहुल पालके, प्रा. सोमनाथ कसबे, उर्दू विषयाचे डॉ. शफी चोपदार, डॉ.मेहबूब शेख यांनी मार्गदर्शन केले.
तसेच, संस्कृत विषयासाठी डॉ. सुरेखा भारती, प्रा. ओमकुमार टोम्पे, पाली विषयासाठी डॉ. नीरज बोधी, प्रा. मुकेश मेहता, प्राकृत विषयाचे डॉ. महावीर शास्त्री, श्री राहुल उपाध्ये, तर कन्नड विषयासाठी डॉ. लक्ष्मीकांत पांचाळ, प्रा. भीमन्ना बेदकपल्ली यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा लाभ विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच संकुलातील विद्यार्थ्यांनी घेतला.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सहायक प्रा. विजयकुमार झुंबरे यांनी काम पाहिले तर भाषा व वाड्.मय संकुलाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.