विद्यापीठातील प्रा. डॉ. विकास पाटील यांच्या वायुशोधक यंत्रास पेटंट प्राप्त

घातक व विषारी नायट्रोजन डाय ऑक्साईडवर केले संशोधन

Spread the love

सोलापूर, दि.22- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल आणि आयक्यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांच्या नायट्रोजन डाय ऑक्साईड वायु शोधक यंत्रास भारत सरकारच्या पेटंट प्रबंधक कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाले आहे.

प्रा.डॉ. पाटील यानी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केलेले आहे. वातावरणातील सर्वात घातक व विषारी नायट्रोजन डाय ऑक्साईड जो वाहन व कारखान्यांच्या धुरातून वातावरणात पसरुन प्रदूषण निर्माण होतो, त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या विषयावर प्रा.डॉ. पाटील यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात वातावरणात नायट्रोजन डाय ऑक्‍साईडचे प्रमाण किती आहे हे ही समजते. डॉ. पाटील यांचे अमोनिया गॅस सेन्सर संदर्भात पेटंट पुर्वीच प्रसिद्ध झाले आहे. वरिल संशोधनाकरीता भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई मधील संशोधकांचे सहकार्य मिळाले आहे. गॅस सेन्सॉर संदर्भातील संशोधनाकरिता बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्स, भारत सरकारकडूनआतापर्यंत त्याना 53 लाखांचे अनुदान मिळाले आहे. त्याच बरोबर सदर संशोधनाचे इंडस्ट्री बरोबरचे technology transfer चे काम अंतीम टप्यात आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे संशोधन करता आले व त्यास पेटंट प्राप्त झाल्याची भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यानिमित्त त्यांचे प्र कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह संकुलाचे संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

• स्त्रोत : राहूल वंजारी (जनसंपर्क अधिकारी PAHSU)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका