विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट
#कारण-राजकारण
सोलापूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. माळशिरस तालुक्यातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेेेत. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना १४ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवत तात्काळ निधीचे वितरण करण्यात येईल, असे सांगितले.
माळशिरस तालुक्यातील रस्ते अंत्यत खराब झालेले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. दळणवळणास व वाहतुकीस अडचण होत आहे. या बाबी लक्षात घेऊन विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेत माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या दुरूस्ती करीता एकूण चौदा कोटी चाळीस लक्ष रुपये निधीची मागणी करताच बांधकाममंत्र्यांनी निधी वितरित करण्याचे आश्वस्त केले.
खालील रस्त्यांकरिता केली मागणी
- नरसिंगपूर-संगम-बाभुळगांव, वाफेगांव-वाघोली-लवंग-बोरगांव-वेळापूर (रा.मा.) २१२ किमी २६/०० ते २७/५०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग- बोरगांव ते वेळापूर) ६० लक्ष.
- अकलूज-महाळुंग-बोरगांव-माळखांबी-तोंडले-बोंडले-तांदुळवाडी-फळवणी-शिंगोणी रस्ता (प्रजिमा) ९३ किमी ३७/०० ते ४५/०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग-फळवणी ते शिंगोणी) ४ कोटी.
- तामसिदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडवावी-बागेचीवाडी ते यशवंतनगर (प्रजिमा) १७७ | किमी १५/०० ते २०/५०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग कोंडबावी पाटीलवस्ती ते यशवंतनगर) २ कोटी.
- तिरखंडी-मेडद-पुरंदावडे-जाधववाडी-इस्लामपूर-मांडकी रस्ता (प्रजिमा) ११६ किमी १०/०० ते १२/०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग-जाधववाडी ते पुरंदावडे) ८० लक्ष.
- कोथळे-कारुंडे-धर्मपुरी-गुरसाळे-दहिगांव-पिरळे-पळसमंडळ-कदमवाडी रस्ता (प्रजिमा) ९४ किमी ०/०० ते १०/५०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग कोथळे-काऊंडे ते नॅशनल हायवे) ४ कोटी.
- यशवंतनगर-गिरझणी-पानीव तरंगफळ-गारवाड रस्ता (प्रजिमा) ११७ किमी ८/०० ते १५/०० सुधारणा करणे, ता.माळशिरस, जि. सोलापूर (भाग-आसरा ढाबा ते तरंगफळ) ३ कोटी.