वर्षातील शेवटचा दिवस व्हावा गोड
नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जसा आलेला दिवस कधीतरी जातोच तसेच आपल्या आयुष्यातही कोणती गोष्ट कायम स्वरूपी टीकून राहत नाही. मग ते सुख असो वा दुःख. एकामागे एक चालतंच असतात. मग आपण का थांबायचं?
सांगोला / नाना हालंगडे
तसा हा दिवस दरवर्षीच येतो. म्हणतात ना सर्व दिवस सारखेच नसतात. लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात.
काही मिळवलेलं असतं तर काही गमावलेलं. काही अपेक्षा पुर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख. पण वेळ कुणासाठी थांबत नसते.
जसा आलेला दिवस कधीतरी जातोच तसेच आपल्या आयुष्यातही कोणती गोष्ट कायम स्वरूपी टीकून राहत नाही. मग ते सुख असो वा दुःख. एकामागे एक चालतंच असतात. मग आपण का थांबायचं?
अडचणी आणि संकटे ही आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठीच येत असतात. त्यातून आपण किती सावरून त्या परिस्थितीशी कसे दोन हात करतो हेच महत्वाचं असतं.
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. आयुष्याचंही तसंच आहे. सुख दुःख तर एकामागे एक धावतंच असतात. मुळात सुख ही एक मानसिक सवय आहे, आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी आणि समाधानी समजाल तितकंच तुम्ही सुखी रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की, आयुष्य पहा कसं सोपं होऊन जातं.
आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणूनच जगा. मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. नुसतं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य सगळ्यांनाच मिळतं पण मिळालेलं ते एक दिवस संपून जाईल म्हणून रडत बसायचं की जे आहे त्यातच समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं, टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका. वेस्ट तर ते तसंही होतच आहे. काय सांगावं आज जे आहे ते उद्या असेलंच?
म्हणून काल जे होतं ते आज नाही म्हणत रडत बसण्यापेक्षा आज जे आहे आणि उद्या जे होणार याचा हसत हसत स्विकार करा. आयुष्याची मजा घ्यायला शिका. वेळ तर तुमची नेहमी मजाच घेत असते.
*संदर्भ : फेसबुक