वनपरिक्षेत्र कार्यालय व पक्षीप्रेमी ग्रुपतर्फे “पक्षी सप्ताह” निमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा
सांगोला (एच.नाना): येथील वनपरीक्षेत्र कार्यालय व पक्षीप्रेमी ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान साजऱ्या होत असलेल्या “पक्षी सप्ताह” निमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी वनपरीक्षेत्र कार्यालय परिसरात पक्षांसाठी घरटी बांधून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत असून 8 नोव्हेंबर रोजी बुद्धेहाळ येथील तलाव परिसरात पक्षी प्रेमीसाठी पक्षी निरीक्षण व कोळा येथे वनक्षेत्र भेट व ट्रेकिंग आयोजित करण्यात आले आहे तर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. डी.बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी झालेल्या घरटी बांधण्याच्या या कार्यक्रमास सेवानिवृत्त वनपाल जी.जी. जोशी, वनरक्षक एस.जे.शिंदे, वाहनचालक स्वप्नील दौंड, वनसेवक सर्वश्री वसंत शिंदे, बाळासाहेब दौंड, शामराव खरात, संजय गायकवाड, पांडुरंग दबडे, धुळदेव सरगर, पोपट पारसे, आबा चंदनशिवे, पक्षीमित्र पत्रकार राजेंद्र यादव, पत्रकार अमेय मस्के, महेश गुरव, सर्पमित्र अकबर बागवान, मयूर भंडारे, प्रथमेश यादव, ओंकार झिरपे आदी उपस्थित होते.