वत्सलादेवी देसाई विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा कौतुकास्पद निर्णय, शाळेच्या बोअरसाठी दिला सबमर्सिबल पंप
हनुमंत नरळे यांचे आदर्शवत कार्य
जवळा : थिंक टँक न्यूज नेटवर्क
आपण आज ज्या मायभूमीत जन्म घेतला, ज्या कर्मभूमीत कार्य केले, ज्या शाळेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्याप्रती ऋण व्यक्त करणे हे कर्तव्य असते. हेच कार्य जवळा येथील कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा हर्षाली इंटरप्राईजेसचे मालक हनुमंत नरळे यांनी केले आहे.
- सर्वाधिक वाचलेल्या बातम्या :
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
- जवळा जि.प. गटात अतुल पवार करणार भूकंप?
- जवळ्यात पिता-पुत्राची ऑनलाईन फसवणूक
- “गायछाप”ला भामट्यांनी लावला “चुना”
श्री. हनुमंत नरळे हे कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले सरकार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब शिंदे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांनी शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. बांधकाम करण्यासाठी पाण्याची व्यवस्था बोअर पाडून केली आहे. हे समजताच हर्षाली इंटरप्राईजेसचे मालक हनुमंत नरळे यांनी स्वतः प्राचार्यांना भेटून पाडलेल्या बोअरमध्ये सबमर्सिबल पंप पूर्ण सेट शाळेस भेट म्हणून दिला आहे. त्यामुळे इमारतीस लागणारे पाणी व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे विद्यालयाच्या वतीने हर्षाली इंटरप्राईजेसचे मालक हणमंत नरळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
सत्कार करतेवेळी प्राचार्य बी.एस. शिंदे सर, श्री. संतोष शेटे सर, श्री. प्रदीप गोरे सर, श्री.घेरडे सर, श्री. लिगाडे सर, अतुल गयाळी पोलीस पाटील, शिक्षकेतर सर्व स्टाफ इत्यादी उपस्थित होते. गावातील लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.