लाखाची लाच घेताना मुख्याध्यापक सापडला

पैशाची मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावरही गुन्हा

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : (एच. नाना) अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास शिक्षण संस्थेच्या सचिवाने उर्वरित ५ लाख मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाच मागणी करणाऱ्या सचिवावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयसिंह गणपती पुजारी, वय ५६ वर्षे. व्यवसाय नोकरी, पद मुख्याध्यापक, जवाहर ग्रामविकास मंडळ, वाळूज ता. मोहोळ जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर संस्था सचिव खाजगी इसम शाम उर्फ रोहित जनार्दन कादे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांनी दिवंगत वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपीक या पदावर नोकरी मिळवण्याकरीता जवाहर ग्रामविकास मंडळ, या संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता.
परिणामी संस्थेकडून तक्रारदार यांच्या विनंती अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केली होती. या रिट पिटीशन अर्जावर न्यायालयात तक्रारदार यांच्या बाजूने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा तत्वावर संस्थेमध्ये नोकरी देण्याकरीता यातील दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे १४ लाख रुपये व सेवेत सामावून घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती.

त्यास अनुसरून तक्रारदार यांनी १४ लाख पैकी ०९ लाख रुपये पहिला हप्ता म्हणून नोकरीमध्ये रुजू होण्यापूर्वीच यातील आरोपींना समक्ष दिला होता.

त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच तक्रारदार यांचे विनंतीनुसार तक्रारदार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यानंतर यातील आरोपी मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे १४ लाख रुपये रक्कमेपैकी उर्वरीत ०५ लाख रुपये संस्थेच्या सचिव यांना देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे तगादा लावून सदर ०५ लाख रुपये घेवून भेटण्याकरीता बोलावले होते.

त्यावरून दि. १७/११/२०२१ व १८/११/२०२१ रोजी दोन्ही आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक यांनी ०५ लाखांपैकी पहिला हप्ता १ लाख घेण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आरोपी सचिव यांना देण्याकरीता स्विकारली असता मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी संस्था सचिव यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अमलदार चडचणकर, पो.ह. सोनवणे, पो.ना. घुगे,पो.ना. घाडगे, पो.शि. जानराव, पो.शि. पवार, पो.शि. सण्णके, पो.शि. मुल्ला चा.पो.शि. सुरवसे यांच्या पथकाने केली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका