लसीपासून पळ काढणाऱ्यांची गय नाही
सांगोला तालुक्यात 10 गावांत पालक अधिकारी नेमले
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण ११४४ गावांपैकी १०१ गावांमधील लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. सदर गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर १०१ गावांमध्ये पालक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात 10 गावांमध्ये पालक अधिकारी नेमले आहेत. त्यामुळे लसीपासून आता फार काळ पळ काढता येणार नाही.
सांगोला / नाना हालंगडे
गैरसमज व चुकीच्या मानसिकतेमुळे अनेकजण कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यास तयार नाहीत. आता मात्र त्यांची गय नाही. ज्यांनी लस घेतली नाही त्यांचा गावागावांत कसून शोध घेऊन लस टोचण्याचा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यानुसार सांगोला तालुक्यात 10 गावांमध्ये पालक अधिकारी नेमले आहेत. त्यामुळे लसीपासून आता फार काळ पळ काढता येणार नाही.
10 गावांमध्ये लसीकरण कमी
सांगोला तालुक्यातील 10 गावांमध्ये कोरोना लसीकरण कमी झाल्याने तेथील सरपंचांना सीईओ दिलीप स्वामी यांनी नोटिसा धाडल्या होत्या. अशातच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतेच पालक अधिकारी यांच्या नेमणुका करण्याचे सांगितले होते. त्याअनुषंगाने आज सांगोला तालुक्यात 10 पालक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.
कारणांचा शोध घ्या
सांगोला तालुक्यातील 102 गावापैकी 10 गावांमध्ये कोरोना लसीकरण हे कमी झालेले आहे. त्याअनुषंगाने लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी मागील चार दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी नोटीस धाडली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कडक पावले उचलत, पालक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत हे लसीकरण करण्यात येणार आहे, असे सांगितले होते. यासाठी आत्ता 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 या तीन दिवसात हे लसीकरण करा, असे सक्त आदेशच यांनी दिले आहेत.
सोलापूर जिल्हा पिछाडीवर
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोवीड -१९ ) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार दि . १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करणेत आलेली आहे. त्यातील कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पद सिध्द अध्यक्ष आहेत. तसेच दिनांक १४ मार्च २०२० च्या अधिसुचनेमध्ये नमूद नियम १० नुसार सदर नियमांची अंमलबजावणी करणेकामी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.
जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ७२ टक्केच
राज्यातील Covid १९ लसीकरणाचे प्रमाण ८५ % असून , सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ७२% एवढे आहे. प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. कोविड १९ लसीकरणा संदर्भात अपर मुख्य सचिव यांनी सोलापूर जिल्हयाचे लसीकरणाचे काम कमी असल्याबाबत नाराजी व्यक्त करून लसीकरणाची गती वाढविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण ११४४ गावांपैकी १०१ गावांमधील लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. सदर गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर १०१ गावांमध्ये पालक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.