राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे
राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ
थिंक टँक : नाना हालंगडे
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज सकाळी ६ वाजल्यापासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर आणि पुण्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी हसन मुश्रीफ यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता.
आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यातून हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा कारखाना ब्रिक्स इंडिया लिमिटेडला विकण्यात आला. ज्यांच्यावर साखर कारखाना चालवल्याचा आरोप होता. हसन हे ब्रिक्स इंडियाचे मालक मुश्रीफ यांचे जावई आहेत. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे काढण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते.
कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.
हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती.
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावरही छापेमारी
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.
कोण आहेत हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते ठाकरे सरकार काळातील महाविकास आघाडी या सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्राम विकास व कामगार या विभागाचे माजी मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते आतापर्यंत सलग पाचवेळा निवडून आले आहेत. त्यांचे पुर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ आहे.
हेही वाचा