राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचा तडकाफडकी राजीनामा
नव्या वर्षात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे . मात्र त्यांनी राजीनामा का दिला हे अद्याप अस्पष्ट आहे.नेमके कारण मात्र समजू शकले नाही .
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. वय जास्त झाल्याने सर्वत्र फिरणे होत नाही त्यामुळे पक्षाला वेळ देता येईना, उगीच त्रास कशाला म्हणून आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती काका साठे यांनी पत्रकारांना दिली आहे. मात्र एवढ्या तडकाफडकी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे याचा अंदाज येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेश पाटील यांना पक्षाने अध्यक्षपद देण्याचे नियोजन केले होते. मात्र काही नेत्यांनी विरोध केला. काका साठे यांनी नको म्हणताना ही त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद टाकण्यात आले होते. निवडणूक झाली, जिल्ह्यात पक्षाने बरे यश मिळाले, काकांचे नाव झाले.
साठे यांनी आपले राजीनामा पत्र बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे पाठवले आहे . आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष श्रेष्टीं साठे यांचा राजीनामा स्वीकारणार का ? स्वीकारले तर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे .
नव्या वर्षात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे . मात्र त्यांनी राजीनामा का दिला हे अद्याप अस्पष्ट आहे.नेमके कारण मात्र समजू शकले नाही . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि ते जेष्ठ नेते आहेत.त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .