रामदेव बाबांचा पतंजली समूह उतरणार माध्यम क्षेत्रात
Think Tank News Network
योगगुरू रामदेव बाबांचा पतंजली समूह माध्यम क्षेत्रात उतरणार आहे. दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी ही माहिती दिली आहे.
“पतंजली ग्रुपची सध्या 40 हजार कोटींची उलाढाल आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल शंभर कोटी होईल. या शिवाय येणाऱ्या काही वर्षात आमच्या ग्रुपमध्ये पतंजली आयुर्वेदीक, पतंजली वेलनेस या नावांचा समावेश होईल. शिवाय आम्ही माध्यम क्षेत्रात देखील येत आहोत, अशी माहिती बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषेदेत दिली. (Patanjali)
पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ होत असल्याच्या आरोपांना बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी उत्तर देण्यासाठी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पतंजलीवर होणाऱ्या भेसळीच्या आरोपांना उत्तर दिले.
पत्रकार परिषेदेत बोलताना बाबा रामदेव म्हणाले, “आमच्या कोणत्याही उत्पादनात भेसळ नाही. परंतु, स्पर्धेक कंपन्यांकडून बदनामी करण्यासाठी खोटा प्रचार केला जातोय. सध्याच्या परिस्थितीत माध्यमांमध्ये देखीम पतंजलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातंय. बाबा रामदेव हा काही दहशतवादी नाही. परंतु, समाजात आमच्याबाबत वाईट पद्धतीने प्रचार केला जातोय. पतंजली खाद्य तेलाचे काही नमुने अधिकृत लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. गाझियाबादमधील एका लॅबने आम्ही पाठवलेल्या नमुन्याची तपासणी करून या पेक्षा शुद्ध तेल इतर कोणत्याच कंपनीचं नसल्याचे सांगितले आहे.
बाबा रामदेव पुढे म्हणाले की, “मार्केटमध्ये नाव कमवण्यासाठी खूप वर्षे लागतात. परंतु, हे नाव खराब करण्यासाठी काही क्षण लागतात. एखाद्या आरोपामुळे अनेक वर्षांपासून तयार केलेली ओळख अगदी काही क्षणात ढासळते. अनेक लोकांना पतंजलीची प्रगती सहन होत नाही.
त्यामुळे पतंजलीला बदनाम करण्यासाठी पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत. परंतु, हे सर्व आरोप पूर्ण पणे खोटे आहेत. रूची सोयाची 4300 कोटींमध्ये खरेदी केली केली होती. तीच आज जवळपास 50 हजार कोटींची उलाढाल असलेली कंपनी बनली आहे. 2047 ला भारताला स्वतंत्र होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी हीच उलाढाल शंभर कोटींच्या जवळ असेल.
हर्षवर्धन पाटील बदाबदा मारायचे; शहाजीबापूंनी जागवल्या बालपणीच्या आठवणी
‘पतंजलीच्या कोणत्याही उत्पादनात भेसळ नाही. परंतु, स्पर्धेक कंपन्यांकडून बदनामी करण्यासाठी खोटा प्रचार केला जातोय, असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे.
पाहा खास व्हिडिओ