राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीतून धक्कादायक खुलासा
सांगोला, मंगळवेढा, जत तालुक्यांची पाहणी

सांगोला/नाना हालंगडे
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके आणि डॉ गोविंद काळे यांनी तीन दिवसांचा सांगोला, मंगळवेढा, जत या सीमावर्ती भागातील तालुक्यांचा दौरा केला, अनेक आश्रम शाळा आणि गावांना त्यांनी भेटी दिल्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीतून धक्कादायक वास्तव पुुढं आलं आहे.
या तीन तालुक्यातील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण, स्थलांतरित लोकांचे प्रश्न, आश्रमशाळा प्रभावीपणे कार्यरत आहेत की नाहीत या अनुषंगाने महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात अनेक गावांना भेटी दिल्या, बहुजन कल्याण खात्याकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजना जाचक अटीमुळे आजही ओबीसी भटक्यांना मिळत नाहीत, असे विदारक सत्य दिसून आल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली.
प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी भटक्यांना आजही बहुतेक गावांमध्ये कागदपत्रे आणि रहिवाशी पुरावे उपलब्ध होत नाहीत. परिणामी अनेक शासकीय योजनांपासून हा प्रवर्ग आजही वंचित आहे.
आश्रमशाळा उदंड झाल्या; पण त्या आश्रमशाळांची अवस्था दयनीय असल्याचे भेटींअंती निदर्शनास आले. या संदर्भात आश्रम शाळा आणि शासन आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचे शोषण या संदर्भात राज्यपाल महोदय यांची भेट घेऊन अहवाल सादर करणार असल्याचे प्रा लक्ष्मण हाके यांनी नमूद केले.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके आणि डॉ गोविंद काळे यांनी तीन दिवसांचा सांगोला, मंगळवेढा, जत या सीमावर्ती भागातील तालुक्यांचा दौरा केला, अनेक आश्रम शाळा आणि गावांना त्यांनी भेटी दिल्या, या तीन तालुक्यातील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण, स्थलांतरित लोकांचे प्रश्न, आश्रमशाळा प्रभावीपणे कार्यरत आहेत की नाहीत या अनुषंगाने महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात अनेक गावांना भेटी दिल्या, बहुजन कल्याण खात्याकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आढावा तालुका दंडाधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतला.