राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ

रविवारी 11 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

Spread the love

राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दोन हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा कमृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९२,५९,६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,९९,८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४२,०२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ११,८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,९९,८६८ झाली आहे.

राज्यात आज 50 ओमायक्रॉनचे रुग्ण
आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

गेल्या सात दिवसातील कोरोना रूग्ण संख्या
1 जानेवारी 2022 – 9,170 रुग्ण
31 डिसेंबर – 8067 रुग्ण
30 डिसेंबर – 5368 रूग्ण
29 डिसेंबर – 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर – 1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर – 1485 रूग्ण

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी, आज 8,036 रुग्णांची नोंद
मुंबईत आज 8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाही मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 376 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 183 दिवसांवर पोहचला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका