राज्यात इंधनाचे दर कमी होणार नाहीत : अजित पवार

पंढरपुरात पत्रकारांशी साधला संवाद

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केले. अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला. तेव्हा महाराष्ट्रात इंधनाचे दर कधी कमी होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी इंधनाचे दर कमी होणार नसल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी केले, यामुळे पेट्रोल १० आणि डिझेल हे ५ रुपयांनी स्वस्त झाले. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयापाठोपाठ अनेक राज्यांनी विशेषतः भाजप शासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट ( मूल्यवर्धित कर ) कमी केला. तेव्हा शंभरी पार कलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर हे काही प्रमाणात कमी झाल्याचं देशभर चित्र देशभर बघायला मिळालं. असं असताना महाराष्ट्रातही इंधनावरील दर कधी आणि किती रुपयांनी कमी केले जातात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित वापर हे आज सकाळी पंढरपूर इथे कार्तिकी एकादशीनिमित्त आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना इंधनाचे दर कमी करण्याबाबतची राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. “राज्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, महाराष्ट्राला माहिती देतो की रोज ४५० कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात, हा खर्च महिन्यातला दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा कुठेच थांबलेला नाही. तो करावाच लागतो. काही गोष्टी या अशा असतात की त्या थांबवता येत नाही “, असं सांगत इंधनाचे दर येत्या काळात कमी करण्याचा राज्य शासनाचा कोणताही विचार नसल्याचा सूर अजित पवार यांनी लावला.

एकंदरितच कोरोना काळ आणि टाळेबंदी, करोना उपचरांवर झालेला खर्च, इतर विभागांच्या खर्चाला लागलेली कात्री या सर्वांमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असतांना इंधन दर कपात करणे राज्य सरकारला सध्या परवडणारे नसल्याचं एकप्रकारे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेले काही दिवस राज्याने इंधनाचे दर कमी करावे ही मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे, सातत्याने आंदोलन करत आहे, महाविकास आघाडीवर टीका करत आला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भुमिवर आता भाजप काय भुमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका