ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

राजेवाडी तलावावर पर्यटक लुटतायेत आनंद

Spread the love

तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात पिके आता शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.शिवाय खात्रीशीर पाण्याची व्यवस्था झाल्याने या भागातील शेतकरी ऊस, द्राक्ष अशा नगदी पिकाबरोबरच फळबागा कडे वळले असून शेकडो एकर पडीक जमीन लागवडीखाली येत आहे. 

स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील दुष्काळी माणदेशी पट्ट्यातील शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ब्रिटिशांनी सुमारे १४४ वर्षांपूर्वी बांधलेला राजेवाडी तलाव सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देणाऱ्या हा राजेवाडी तलाव पर्यटकांना खुणावतो आहे. The Rajewadi Lake, built by the British about 144 years ago, has been filled to its full capacity for the fourth consecutive year. This Rajewadi lake is a tourist attraction that gives a beach feel.

सोलापूर , सांगली, सातारा या दुष्काळी माणदेशातील शेती व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १४४ वर्षांपूर्वी माणगंगा नदीवर राजेवाडी तलाव बांधण्यात आला.या तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि.सांगली) हद्दीत आहे.तर पाणीसाठा माण (जि.सातारा) हद्दीत आहे.

सन २०१० मध्ये पूर्णण क्षमतेने भरलेला हा राजेवाडी वरचेवर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सन २०१८ पर्यंत कधीही पूर्ण क्षमतेनेे भरला नाही.मात्र २०१९ पासून सलग चार वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेनेे भरत आला आहे. चालू हंगामात उशिराा का होईना परंतुु हा तलाव पूर्णण क्षमतेने भरल्यानेेे लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याा आहेत. Though late in the current season, the hopes of the beneficiary farmers have been dashed as the lake is filled to capacity.

राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील हा माणदेशी पट्टा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होता.या पट्ट्यात केवळ पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेता येत होते. मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात पिके आता शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.शिवाय खात्रीशीर पाण्याची व्यवस्था झाल्याने या भागातील शेतकरी ऊस, द्राक्ष अशा नगदी पिकाबरोबरच फळबागा कडे वळले असून शेकडो एकर पडीक जमीन लागवडीखाली येत आहे.

एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला लाभ
तलावाची पाणी साठवणूक क्षमता १६९२  दशलक्ष घनफूट इतकी आहे.या तलावाच्या पाण्यावरती माण (जि.सातारा) तालुक्यातील पूर्वेकडील गावे अवलंबून आहेत.तर आटपाडी (जि.सांगली) तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, दिघंची, पुजारवाडी, उंबरगाव तर सांगोला(जि.सोलापूर) तालुक्यातील कटफळ, खवासपूर, लक्ष्मीनगर, चिकमहूद, अचकदाणी, जाधववाडी, नरळेवाडी, महूद, वाकी या गावातील सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक शेतीला पाण्याचा लाभ होतो.मागणीनुसार हंगाम निहाय या पाण्याचे नियोजन केले जाते.सुमारे तीन किलोमीटर लांबीचा भुयारी कालवा खोदून हे पाणी सांगोला तालुक्यात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा भुयारी कालवा अद्यापही कार्यान्वित आहे.

सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे समुद्रकिनाऱ्याचा अनुभव
राजेवाडी तलावाचा सांडवा पाच फूट रुंद व एक किलोमीटर हून अधिक लांबीचा आहे.त्यावरून वाहणारे पाणी अगदी समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देत आहे. त्यामुळे हा तलाव पर्यटकांसाठी खास आकर्षणही ठरला आहे. तलावातील सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटक येथे गर्दी करत आहेत. सध्या दिवाळी सुट्टी सुरू असल्याने पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
तलावाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर चिलार उगवले आहे. हे चिलार काढून स्वच्छता करायला हवी.तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामुळे हा ऐतिहासिक ठेवा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

राजेवाडी तलावाचा व्हिडिओ पाहा

सांगोला तालुक्यातील प्रकल्प भरून घ्यावेत 
राजेवडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने सांडव्यावरून वाहणारे पाणी नदीतून पुढे वाया जात आहे.हे वाया जाणारे पाणी कालव्यातून सोडून सांगोला तालुक्यातील पाझर तलाव,बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी सांगोला तालुक्यातील  शेतकऱ्यांमधून होत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने या भागातील प्रकल्प कोरडे आहेत.

हे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका