थिंक टँक / नाना हालंगडे
बोल्डगर्ल राखी सावंतची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी १९ जानेवारी रोजी राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केली होती. राखीवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल शर्लीन चोप्राने तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. दिवसभराच्या चौकशीनंतर राखी तिचा नवरा आदिल खान दुर्रानीसोबत पोलीस ठाण्यातून बाहेर आली. बाहेर येताना ती खूप शांत होती आणि छायाचित्रकारांना बघून ती फक्त ‘जय महाराष्ट्र’ एवढंच बोलली.
राखीला बहुधा दंडाधिकाऱ्यांसमोर नेण्याची शक्यता होती, परंतु तिला जामीन मंजूर करण्यात आला. माणुसकीचा हवाला देत तिची अटक थांबविण्यात आली. राखी तिचा नवरा आदिल खान दुर्रानीसोबत पोलीस ठाण्यातून बाहेर आली. बाहेर येताना ती खूप शांत होती आणि छायाचित्रकारांना बघून ती फक्त ‘जय महाराष्ट्र’ एवढंच बोलली. यानंतर, ती तिच्या आईला भेटायला रुग्णालयात गेली. राखीची आई कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या आजारांशी झगडत आहे आणि त्यावर उपचार घेत आहे.
शर्लिन चोप्राचे वकील सुहेल शरीफ म्हणाले, ‘राखी सावंतने तिच्या आईचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले, ज्यावरून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं दिसून येतं. या आधारावर आणि मानवतेच्या आधारावर, शर्लिन आणि तिच्या वकिलांनी तिच्या अटकेसाठी कोणताही दबाव आणला नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राखी सावंत पती आदिल खानसोबत पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना दिसते. यावेळी ती खूप शांत होती आणि आदिलच सर्व गोष्टी हाताळताना दिसत होता. पोलिसांनी काय प्रश्न विचारले असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा राखीने हात जोडून फक्त जय महाराष्ट्र एवढंच म्हटलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला घरी जाण्याची परवानगी दिली. राखीने चौकशीत सहकार्य केले आणि तिचा मोबाईल तपासासाठी आमच्याकडे सुपूर्द केला,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिला अटक करण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते.
एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. या महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. यासंदर्भात संबंधित मॉडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
अभिनेत्री शरलीन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली होती. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली होती.
राखी सावंत गुरुवारी दुपारी तिचा पती आदिल खान दुरानी याच्यासमवेत भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं उद्घाटनही करणार होती. दुपारी ३ च्या सुमारास हे उद्घाटन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडले.
शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
राखी सावंत गेल्या दोन दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीवरून चर्चेत होती. राखी सावंत गरोदर असल्याचं बोललं जात होतं. विरल भयानी यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राखी सावंत गरोदर असल्याचं स्वत: राखीने म्हटल्याचं नमूद केलं होतं. नंतर ही पोस्ट डिलीट झाल्याचं दिसून आलं. मात्र, या पोस्टमुळे राखी सावंतच्या गरोदरपणावर चांगलीच चर्चा रंगली. यासंदर्भात राखी सावंतला पत्रकारांनी विचारणा केली असता तिने फक्त ‘नो कमेंट्स’ म्हणत उत्तर देणं टाळलं होतं.
हेही वाचा
विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य