यंदाचा दसरा आहे विशेष; 3 शुभयोग एकाच मुहूर्तावर
विजयादशमी विशेष लेख
सांगोला/ नाना हालंगडे
विजयादशमी (Vijaya Dashami) अर्थात दसरा (Dussehra) हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या दशमीला हा सण (Festival) साजरा केला जातो. भारतीय परंपरेत विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीराम (Prabu Shree Ram) यांनी याच दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता. दुर्गादेवीनं (Druga Devi) दैत्य महिषासुराचा संहार याच दिवशी केला होता, असं सांगितलं जातं. विजयादशमीला नवरात्रोत्सवाची (Navaratri) समाप्ती होते. अशी वैशिष्ट्यपूर्ण विजयादशमी यंदा शुक्रवारी (15 ऑक्टोबर) साजरी होत आहे. यंदाचा दसरा काही विशेष योगांमुळे वैशिष्ट्यपूर्ण असेल. या दिवशीच्या विशेष योगांविषयीची माहिती ` दिली आहे.
विजयादशमी अर्थात दसरा हा महत्त्वाच्या सणांपैकी एक. साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या या मुहूर्तावर अनेक शुभ गोष्टी करण्याकडे, सोन्यासारख्या काही विशेष गोष्टी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. यंदा शुक्रवारी (15 ऑक्टोबर) साजरी होणारी विजयादशमी खास असणार आहे. कारण या दिवशी काही विशेष योग तयार येत आहेत. 14 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी विजयादशमीला प्रारंभ होईल. 15 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांपर्यंत दशमी असेल.
15 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी दुपारी 2 वाजून 1 मिनिटांपासून ते 2 वाजून 47 मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे. या मुहूर्ताचा एकूण कालावधी 46 मिनिटं आहे. पूजेचा मुहूर्त दुपारी 1 वाजून 15 मिनिटांपासून ते 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे, अशी माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा यांनी दिली.
दसरा पूजा महूर्त
यंदा नवरात्रोत्सवाचा प्रारंभ 7 ऑक्टोबरला झाला. शुक्रवारी अर्थात 15 ऑक्टोबरला दसरा साजरा होत आहे. दोन तिथी एकत्र आल्यानं नवरात्रोत्सवाचा कालावधी 8 दिवसांचा राहिला.
14 ऑक्टोबरला महानवमी (Mahanavmi) आणि 15 ऑक्टोबरला दसरा आहे. महानवमीची तिथी 14 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर दशमी सुरू होईल. 15 ऑक्टोबरला उदय तिथीला विजया दशमी साजरी केली जाईल, असं डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.
श्रीरामाचं पूजन
विजयादशमीला महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीचं आणि प्रभू श्रीराम यांचं पूजन करावं. दुर्गादेवीची पूजा केल्यानं तिची कृपा आपल्यावर राहते, असं सांगितलं जातं. यामुळे जीवनातले कष्ट, दुःख, चिंता, दारिद्र्य नष्ट होतं आणि विजयप्राप्ती होते. प्रभू श्रीरामांचं पूजन केलं असता, प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्यांना विजय प्राप्त होतो. तसंच यासाठी प्रेरणाही मिळते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रुप भादोलेची पोस्ट या दिवशी शस्त्रास्त्रांचं पूजन करणं हितावह मानलं जातं. नवग्रहांची कृपा राहावी यासाठी दसऱ्याची पूजा महत्त्वाची मानली जाते, असं डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.
या दिवशी चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचं कापड घालावं आणि त्यावर प्रभू श्रीराम आणि दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर हळदीनं तांदूळ पिवळे करून त्याचं स्वस्तिक काढावं आणि श्री गणेशाचं प्रतीक मानून त्याची पूजा करावी. नवग्रहांची स्थापना करावी. त्यानंतर आपल्या आराध्य देवतांची पूजा करावी. त्यांना लाल फुलं अर्पण करावीत. गुळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर यशाशक्ती दक्षिणा देऊन गरीबांना अन्नदान करावं. धर्मध्वजाचं प्रतीक म्हणून पूजेच्या ठिकाणी विजयध्वज लावावा.
अनीती, अधर्म, वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याची प्रेरणा विजयादशमीच्या पर्वातून मिळते, असं डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.
तीन शुभ योग
यंदा शुक्रवारी म्हणजेच विजयादशमीला तीन शुभ योग होत आहेत. त्यात रवि योग 14 ऑक्टोबरला रात्री 9 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. 16 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 31 मिनिटांपर्यंत हा योग असेल. सर्वार्थ सिद्ध योग 15 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांपासून ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय सूर्योदयापासून 9 वाजून 16 मिनिटांपर्यंत कुमार योग असेल. या तीन शुभ योगांमध्ये दसरा पूजन करणं प्रत्येकासाठी शुभ ठरेल, असे पांचांगमध्ये सांगितले आहे.