मुलीला लग्नात दिला जेसीबी भेट
काय सांगता?, नेमकं काय घडलं?
मुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.
थिंक टँक न्यूज नेटवर्क
लग्नात मुलीला दुचाकी किंवा इतर महागडी वस्तू भेट दिल्याचा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. आपल्या जावयाचा लाड म्हणून काही सासरे लोकांनी कार दिल्याचेही दिसते. पण उत्तरप्रदेशातील हमीरपूरमध्ये एका वधूपित्याने आपल्या मुलीला लग्नात चक्क जेसीबी भेट दिला आहे. या गिफ्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
नवरीचे वडिल सेवानिवृत्त आर्मीमॅन आहेत. याप्रसंगी पत्रकारांना बोलताना नववधू नेहा हीचे वडील म्हणाले की, “मुलीला कार भेट दिली असती तर ती घरासमोरच उभी ठेवावी लागली असती. पण जेसीबी भेट दिल्याने त्यांच्या उत्पन्नाला हातभार लागणार आहे. तर मुलीला देखील कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही. यातून 2 ते 3 जणांना रोजगार देखील मिळणार आहे.”
जेसीबीची किमंत सुमारे 30 लाख
या जेसीबीची किमंत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नवरदेव वायूसेनेत कार्यरत आहेत. ही घटना सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देव गावातील आहे. येथील विकास उर्फ योगेंद्र हा हवाई दलात कार्यरत आहे. त्याचे वडील स्वामीदिन चक्रवर्ती यांनी योगेंद्रचे लग्न नेहाशी ठरविले होते. माजी सैनिक परसराम प्रजापती यांची नेहा मुलगी आहे. नेहा स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे.
लग्न झाले थाटामाटात
15 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडला 15 डिसेंबर रोजी शिव लॉन गार्डन गेस्ट हाऊसमध्ये नेहा-योगेंद्रचे लग्न थाटामाटात पार पडले. मुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.
जेसीबी हे उत्पन्नाचे साधन
नववधू नेहाने सांगितले की, जेसीबी भेट देण्यामागे वडिलांचे म्हणणे आहे की, भेट म्हणून कार दिली असती तर ती केवळ घरासमोर उभी ठेवावी लागली असती. मात्र, जेसीबी हे उत्पन्नाचे साधन आहे. मी सिव्हिल सर्विसची तयारी करत आहे. मलाही माझ्या पतीकडून पैसे मागावे लागणार नाहीत. त्यासाठी ही भेट मला वडिलांनी दिली आहे.
नवरदेवालाही झाला आनंद
ही गिफ्ट पाहून नवरदेवालाही झाला आनंद झाला. नवरदेव योगेद्र म्हणाला की, माझे सासरे शिपाई राहीलेले आहेत. एक सैनिक किती दिवस घरी राहू शकतो? यांची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी कारऐवजी जेसीबी देणे योग्य मानले. यातून दोन जणांना रोजगारही मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. जर मी कार घेतली असती तर मला ती चालवायला वेळ कुठे मिळाला असता? त्यामुळे त्यांनी दिलेली भेट मी देखील स्विकारली आहे.
हेच आदर्श उदाहरण
हे उदाहरण आदर्शच म्हणावे लागेल. हल्ली आपल्याकडे लग्नखर्चात लाखो रुपये उधळतात. त्याचीच बचत केल्यास दीर्घकालीन उपाययोजना करता येवू शकतात.
हेही वाचा