ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

मुख्यमंत्री साहेब, वाढदिनीच शेतकऱ्यांची वीज तोडता, कसले हे अभिष्टचिंतन?

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा खोचक सवाल

Spread the love

शेतकरी आधीच संकटात आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. असे असताना शेतकर्‍यांकडून थकित वीजबिलाची वसुली केली जातेय. सरकारने शेतकर्‍यांची वीजतोडणी करु नये, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय आहेत. ते सतत विविध विषयावर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट व्हायरल झालेल्या पाहायला मिळतात. आज गुरुवार, 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन व वीजतोडणीबाबत पोस्ट केली होती. या पोस्टची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसभर सोशल मिडीयावर ही पोस्ट व्हायरल झाली. (CM Eknath Shinde)

Dr. Babasaheb Deshmukh, Regional President of Shetkari Kamgar Party, Purogami Yuvak Sanghatana is very active on social media. They are constantly sharing posts on various topics. Their posts are seen going viral. Today, Thursday, February 9, on the birthday of Chief Minister Eknath Shinde, there was a post about Abhishtachintan and power cut. This post is getting a lot of discussion. This post went viral on social media throughout the day.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जन्मदिनाचे औचित्य साधून गावोगावचा वीज पुरवठा तोडला जात आहे आणि तुम्ही शुभेच्छांचा स्विकार करत आहात! हे कसले अभिष्टचिंतन वाढदिवसाचे करता आहात? जन्मदिनी काहीच मागणी करत नाही. पण किमान आहे ते भरास आलेले पीक तरी घरात येऊ द्या. हातात पडू द्या.”

“शेतकरी गोरगरिब जनतेला तुम्ही आधार देण्याऐवजी, गावोगावची वीजतोडणी करून जन्मदिवसाचे परतावा/रिटर्न गिफ्ट देत आहात का? तुम्ही मोठे आहात मान्य आहे, अन्यायाविरोधात लढा देऊन तुम्ही सर्वांचा रोष ओढवून सरकार स्थापन केलंत. पण आज काय अवस्था जनतेची आहे? हे ही लक्षात घ्या. गावोगावची वीजतोडणी जोमात चालू आहे. या अन्यायाची वाचा फोडावी तर कोणासमोर? तुमचा वाढदिवस आहे दीर्घायुष्याच्या तुम्हास शुभेच्छा. वाढदिवस भव्यदिव्य साजरा करा, पण सोबतच शेतकरी- कामगारांचे हितही लक्षात ठेवा.” असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

सांगोला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीची विकासकाने रोखली जात असल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले होते.

शेतकरी आधीच संकटात आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. असे असताना शेतकर्‍यांकडून थकित वीजबिलाची वसुली केली जातेय. सरकारने शेतकर्‍यांची वीजतोडणी करु नये, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विजेच्या प्रश्नावरून काढला होता मोर्चा
डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकापचे स्वर्गीय नेते भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारानुसार राजकारण करण्याचा प्रयत्न बाबासाहेब करत असतात. मात्र त्यांच्यातील आक्रमकपणाची चुणूक सांगोला येथे काढण्यात आलेल्या मोर्चात दिसून आली होती.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेली पोस्ट.

शेकापकडून सांगोला येथे वीज तोडणीबाबत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले होते. विराट मोर्चात बाबासाहेब देशमुख यांच्यातील आक्रमकपणामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नमते घेत वीज बिलाच्या कारणावरून सुरू केलेली वीज तोडणी मोहीम थांबविली होती.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे सांगोला तालुक्याचा ४० पैशांच्या आत पैसेवारीत समावेश झाला आहे. त्याचाही शेतकऱ्याना फायदा होणार आहे.

सांगोला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीची विकासकाने रोखली जात असल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका