‘मी बैलाची फक्त शिंगं पकडली’ : हसन मुश्रीफ
चंद्रकांत पाटलांवर केला पलटवार
कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : कोल्हापुरात गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकं काढून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नुकतीच चंद्रकात पाटील यांनी केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आ बैल मुझे मार हे माझं नाही, मी फक्त बैलाची शिंगं पकडलीत”, असा पलटवार मुश्रीफ यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच पत्रकबाजी गेल्या 15 दिवसांपासून पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना “मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, जयंत पाटील काही बोलत नाही मात्र हसन मुश्रीफ लगेच बोलायला लागतात, हे म्हणजे आ बैल मुझे मार” असा प्रकार असल्याचं दादांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना आज हसन मुश्रीफ म्हणाले की, आ बैल मुझे मार हे काय माझं नाही, मी फक्त बैलाची शिंगं पकडली आहेत.