थिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

मिठी मारल्याने प्रेम होते घट्ट

आज हग डे (Hug Day) स्पेशल

Spread the love

वारकरी एकमेकांना भेटतात, सीमेवरचा जवान मरणाला मिठी मारतो, प्रियकर-प्रेयसी वा पती-पत्नी एकमेकांना अलिंगन देतात. मग सध्या आपण नव्या पिढीतील सर्वांना भेटल्या नंतर मिठी मारताना बघतो ती मिठी समजायची, की कवळ, की अलिंगन, की गळाभेट? नक्की समजायचे तरी काय?

स्पेशल रिपोर्ट / नाना हालंगडे
आज हग डे अर्थात अलिंगन दिवस. प्रत्येकाच्या हृदयात एक जागा राखीव असते. तरुणाई तर त्यात जास्तच उतावीळ असते. महत्त्वाचा दिवस असलेल्या ‘हग’ अर्थात अलिंगन दिनामागे काहीतरी शास्त्र दडले आहे. जवळच्या व्यक्तीला अलिंगन देण्यात जितके प्रेम असते, तितकेच आरोग्याचेही मूळ असते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

मिठी मारणे, अलिंगन देणे, गळाभेट घेणे, या सगळ्या एकाच शारीरिक क्रियेच्या अनेक छटा आहेत. पण, त्या छटांचा अर्थ प्रसंगानुरूप, वेळोवेळी, नात्यागणिक बदलत असतो. कवटाळणे वा कवेत घेणे हे मराठी शब्द मिठी पेक्षा जास्त जवळचे आहेत. माय लेकराला कवेत घेते.

वारकरी एकमेकांना भेटतात, सीमेवरचा जवान मरणाला मिठी मारतो, प्रियकर-प्रेयसी वा पती-पत्नी एकमेकांना अलिंगन देतात. मग सध्या आपण नव्या पिढीतील सर्वांना भेटल्या नंतर मिठी मारताना बघतो ती मिठी समजायची, की कवळ, की अलिंगन, की गळाभेट? नक्की समजायचे तरी काय?

आलिंगन ही प्रेम व्यक्त करण्याची चांगली पद्धत आहे. कोणी कितीही चिंतेत असले तरी एखाद्याला अलिंगन दिल्याने कोणीतरी सोबत आहे, काळजी घेते, याचे समाधान वाटते. अलिंगन दिल्याने एका व्यक्तीची आत्मिक ऊर्जा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करते. असे केल्याने चिंतेत असलेल्याला काही काळ का होईना, हलके वाटू लागते. एका संशोधनानुसार अलिंगन देल्याने स्मरणशक्ती वाढते आणि तणाव कमी होतो, असे वैद्यक व मानसशास्त्रही सांगते.

हल्ली ज्या ‘हग डे’ चा बोलबाला आहे, त्यामागेही पाश्चात्य शिष्टाचार झळकतो. हगिंगचे खूळ बोकाळले ते अमेरिकेतून. केविन झाबोर्नी या अमेरिकन व्यक्तीने २१ जानेवारी हा दिवस हगिंग डे म्हणून साजरा करायचा प्रस्ताव जगापुढे मांडला आणि तेव्हापासून म्हणजे अमेरिकेत २१ जानेवारीला ‘नॅशनल हगिंग डे’ साजरा होतो.

हगिंग हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग झाला असला तरी तो प्रत्येक ठिकाणी लागू पडत नाही. कामानिमित्त भेटणाऱ्या व्यक्तींना हग करणे शिष्टाचारात बसत नाही. ज्याला आपण हग करतो त्याच्या सांस्कृतिक शिष्टाचारात ते बसत नसेल, तर हग करू नका. अनेकांना अनोळखी स्पर्शाची अ‍ॅलर्जी असते, वावडे असते, तेव्हा सांभाळा.

हळूहळू ही प्रथा पसरत गेली आणि आता नव्या पिढीची प्रातिनिधिक प्रथा झाली. त्यानंतर हाच ‘हग डे’ व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात सातवा दिवस म्हणून साजरा व्हायला लागला. या ‘हग डे’ ला रोमँटिक झालर आहे.

  • मिठी मारण्याचे फायदे
    मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वालाही आपण महत्त्व देतो, हा संदेश जातो.
  • आपल्या माणसाने मिठी मारली तर मूड चांगला होतो.
  • मिठी मारताना हृदयाचे ठोके मंद होतात. रक्तदाबही नियंत्रणात येतो.
  • परस्परांच्या मनातील भावना कळतात.
  • मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होतो.
  • आपल्या पार्टनरला आलिंगन दिल्याने रक्तामध्ये ऑक्सिटोसिन आणि कोर्टिसोल नावाच्या दोन हार्मोन्सचा स्राव होतो. हे हार्मोन्स तणाव आणि परस्परांना समजण्यात मदत करतात.

हगिंग हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग झाला असला तरी तो प्रत्येक ठिकाणी लागू पडत नाही. कामानिमित्त भेटणाऱ्या व्यक्तींना हग करणे शिष्टाचारात बसत नाही. ज्याला आपण हग करतो त्याच्या सांस्कृतिक शिष्टाचारात ते बसत नसेल, तर हग करू नका. अनेकांना अनोळखी स्पर्शाची अ‍ॅलर्जी असते, वावडे असते, तेव्हा सांभाळा.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका