माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील
Mangalwedha Youth festival
थिंक टँक / नाना हालंगडे
सळसळत रक्त हेच उद्याचे भविष्य आहे. काहीतरी करून दाखवण्याची हेच वय असते. धाडस केलं तरच तुम्ही काहीतरी घडवू शकाल. माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका, असे प्रतिपादन शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या 18 व्या युवा महोत्सवातील लोकनृत्य या कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यापूर्वी आ. शहाजीबापू पाटील यांनी युवा महोत्सवाला उपस्थिती लावून तरुणाईतील अंगार चेतविला.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, सैराटमुळे आर्ची महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. पण माझा काय झाडी… काय डोंगार… काय हातील.. हा डायलॉग देशासह परदेशात प्रसिद्ध झाला. युवकांनो, माझ्याकडून काय शिकू नका, तर मी केलेले धाडस तर तुम्ही पाहिले. माझ्याकडून फक्त धाडस शिका. पाऊल टाकताना ते मैदान खेळाचे असो अथवा राजकारणाचे किंवा बायकोसमोर जाण्याचे असो जर कचला तर बरा बकरा सापडला म्हणतील. त्यामुळे मजबूत पाऊल टाका यश तुमच्या समोर आहे.
जीवन घडवण्याचे व स्वप्न बघण्याचे हेच वय आहे. चुकीची स्वप्ने पाहिल्याने जीवनाचे अपघात होतात. ध्येय गाठण्याचे हेच वय आहे. वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवराय तर अलेक्झांडरने जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले. आपली आई , वडील , भाऊ , बहिण , कुठे आहेत याची जाणीव ठेवा. सध्या काळात मोटवरंची गाणं कवाच सध्या निघून गेली आहेत. आधुनिकतेच्या चक्राखाली आनंद गमावून बसलो असून संस्कृती जपून ठेवण्याची गरज आहे जगाच्या कुठल्याही देशात सापणार नाही अशी संस्कृती फक्त भारतात सापडते.
असे सांगतानाच पाटील यांनी काय झाडी , काय डोंगार हा डायलॉग म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. काय ते सुजित कदमचे कॉलेज , काय ते आयोजन , काय तो युवा महोत्सव ते वाक्य सांगत विद्यार्थ्यांच्याकडून टाळ्या घेतल्या.
आ. शहाजी पाटील यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात तरुणाईला खळखळून हसायला लागले. माझी अनेक कामे समोर असताना केवळ आणि केवळ तरुणांना भेटावे म्हणून येथे आलो असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थाध्यक्ष अॅड . सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ . सुभाष कदम , मीनाक्षी कदम , संचालक तेजस्विनी कदम , सचिव प्रियदर्शनी महाडिक , विश्वास महाडीक , फॅबटेक समुहाचे भाऊसाहेब रूपनर , विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ . केदारनाथ काळवणे, संचालक , गुणवंत सरवदे , जकराया शुगरचे बी . बी . जाधव , लतीफ तांबोळी , मानाजीराव माने , आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले . तर आभार लतीफ तांबोळी यांनी मानलेे.
पाहा खास व्हिडिओ