माजी सरपंच चिदानंद सुरवसेसह चारजण अपघातात जागीच ठार
सोलापूर जिल्ह्यासाठी धक्कादायक बातमी
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
एसटी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील चारजण ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह त्यांचे तीन सोबती जागीच ठार झाले.
ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याची माहिती समोर येत आहे.
चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाली. अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले. सुरवसे यांच्यासोबत आणखी तिघे कोण होते त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील सिविल हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.
कार गाडी एमएच 13 सीएस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक केए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाल्याचं सांगण्यात आले आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.