महाराष्ट्रातील कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कलाकार महासंघाच्या शिष्टमंडळास दिले अभिवचन

Spread the love

मुंबई : मुंबईतमधील वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे यांनी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकार कोरोना काळात कशा पद्धतीने जगत आहेत याची व्यथा मांडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारच्या कलाकाराला उपाशी मरू देणार नाही तसेच येणा-या गणेशोत्सव काळात तिसऱ्या लाटेचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रम चालू करण्याची परवानगी दिली जाईल याची ग्वाही दिली.

यावेळी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.शोभा पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष गिरीधर इंगोले, करवीर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. सोनल डोईफोडे आदींचे शिष्टमंडळ हजर होते.

मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदन
कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना गेली १५ ते १६ वर्षे कलाकाराना न्याय मागण्याचे काम शासन दरबारी करीत आहे . गेल्या ३ वर्षामध्ये अनेक संकटे येऊन गेली आणि १५ ते १६ महीने कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना गेली ११ ते १२ महीने कलाकार व मालक यांना मदत जाहीर करण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निवेदने रास्ता रोको आपणांस उपमुख्यमंत्री व विविध मंत्री महोदय यांना निवेदन देऊन व काहीना प्रत्यक्ष भेटून मदतीसाठी चर्चा केली आणि कलाकार व मालक लोकांचे झालेले नुकसान यासाठी एक वेगळे पॅकेज जाहीर करण्यासाठीची मागणी वेळोवेळी केली. आपण वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार, सास्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना घेऊन मिंटीग घेतली आणि महाराष्ट्रातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी 5000 / -ची घोषणा केली. परंतु साहेब कलाकारंची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे. त्यासंख्येमध्ये बदल व्हावा जाहीर झालेल्या संख्येमध्ये बँड, बँजो, ऑकेस्ट्रासह सर्व क्षेत्रातील कलाकाराचा समावेश असावा. आम्हाला नक्की आशा आहे की आपण महाराष्ट्रातील कलाकारांना न्याय देऊन त्यांना जगण्याचे प्रोत्साहन देत आहात. सर्व आपण एक असे मुख्यमंत्री आहात की जे सर्व घटकांच्या बरोबर कलाकारांनाही न्याय देणारे पहीले मुख्यमंत्री आहात. त्याबददल तुम्हाला धन्यवाद देतो. तरी लवकरात लवकर आमच्या मागण्याचा विचार व्हावा.ही नम्र विनंती.

हेही वाचा :

जवळ्याचा कंटेनमेंट झोनमधील समावेश चुकीचा

सांगोलेकरांनो गाफिल राहू नका

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका