मराठी माणूस टिकला नव्हे तर निलंबित झाला पाहिजे, ही सरकारची मानसिकता
सदाभाऊ खोत यांची आझाद मैदानावरून घणाघाती टिका
- हेही वाचा : आमदारांचा बाप ड्रायव्हर हवा होता!
मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
मराठी माणूस टिकला पाहिजे अशा वल्गना एकीकडे करायच्या आणि दुसरीकडे त्याच मराठी माणसाला निलंबित करायचे हा दुटप्पीपणा आहे. मराठी माणूस टिकावा नव्हे तर निलंबित झाला पाहिजे, ही सरकारची मानसिकता असल्याचा घणाघात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत आ. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर ठिय्या मारला आहे. कालची रात्र या दोघांनी आंदोलनस्थळी झोपून काढली.
पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका करताना खोत म्हणाले की, राज्यातील ३० पेक्षा अधिक एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला सरकारकडे वेळ नाही. शेकडो जणांना निलंबित केले आहे. हे दादागिरी चालणार नाही. उध्दव ठाकरे हा चांगला माणूस आहे. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचना देवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. आज रात्रीपर्यंत योग्य तोडगा न निघाल्यास परब यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल. उग्र आंदोलन सुरू करू. एसटी कर्मचारी आता कोणत्याही परस्थितीमध्ये मागे हटणार नाहीत.