मंगळवेढा येथे शिक्षक समितीचा महिला मेळावा
जिल्हा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्याही होणार निवडी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. १९ रोजी जिल्ह्यातील शिक्षक भगिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक महिला भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगोला शाखेच्या अध्यक्षा सुजाता देशमुख यांनी केले आहे.
मंगळवेढा येथील रजपूत लाॕन्स येथे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दु. १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असून यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे , कार्याध्यक्ष राजेंद्र नवले , महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे , पुणे विभागाचे अध्यक्ष दयानंद कवडे यांच्यासह शिक्षक समितीचे मान्यवर जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .या मेळाव्यात शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकार्यांच्या निवडी घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहून कार्यरत असणारी बलशाली मान्यताप्राप्त संघटना असून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची गेल्या ६० वर्षांपासून सोडवणूक केली जाते . महिलांना नेतृत्वाची संधी मिळावी व महिला शिक्षिकांच्या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने व्हावी यासाठी शिक्षक समितीने स्वतंत्र महिला आघाडी गठीत करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक तालुका शाखेतून दोन महिलांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान दिले जाणार आहे .
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षक भगिनींनी सहभागी व्हावे आसे आवाहन सरचिटणीस सरला शिर्के,यांच्यासह तालुका शाखेतील पदाधिकारी शिक्षक नेत्या नयना पाटील, जिल्हा प्रतनिधी अंबिका शिंदे,सुनिता खंकाळ, शहराध्यक्षा अलका कोल्हे, कार्याध्यक्षा शहनाज आतार, कोषाध्यक्षा शारदा सरगर, शहर चिटणीस जयश्री खांडेकर, कार्यालयीन चिटणीस सविता राऊत, उपाध्यक्षा संगिताबनसोडे, संगिता केसकर,सुवर्णा पाटील, स्वाती बनसोडे, मायाक्का बंडगर, प्रवक्त्या बेबीनंदा गेजगे, प्रसिद्धीप्रमुख शितल गुरव व सर्व केंद्रसंघटक यांनी केले आहे.