भीमा कोरेगावच्या सन्मानार्थ भारत मुक्ती मोर्चा करणार जेल भरो आंदोलन
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांची माहिती
ही जनतेला मिळालेल्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली आहे. सरकार इतर सर्व कार्यक्रमांना परवानगी देत आहे. मात्र भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमास विविध प्रकारची कारणे सांगून परवानगी नाकारत आहे.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
तमाम आंबेडकरी जनतेचे आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी सभा व कार्यक्रमांना सरकारने परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी १ जानेवारी रोजी सांगोला येथे भारत मुक्ती मोर्चातर्फे जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक तथा बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.
याबाबत सांगोला पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तमाम आंबेडकरी जनतेचे आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी सभा व कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ही जनतेला मिळालेल्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली आहे.
सरकार इतर सर्व कार्यक्रमांना परवानगी देत आहे. मात्र भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमास विविध प्रकारची कारणे सांगून परवानगी नाकारत आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांच्या संविधानाचा अपमान आहे.
सांगोला येथे १ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कायद्याचे पालन करून जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष हमिदभाई बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत