ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

भिडे गुरुजी चिडले, “त्या मुलीवर कारवाई करा. अन्यथा..” मेहता पब्लिशिंगला दिला इशारा

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क
इन्फोसिसच्या प्रमुख तथा सुप्रसिध्द लेखिका सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले होते. मात्र, सुधा मूर्ती यांनी नव्हे तर भिडे गुरुजी यांनीच पाठलाग करून सुधा मूर्ती यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला असा खळबळजनक खुलासा करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या “त्या” मुलीवर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे गुरुजी यांनी ट्विटरवरून केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इन्फोसिस कंपनीच्या प्रमुख तथा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती या सांगली येथे मेहता पब्लिशिंग हाऊसने आयोजित केलेल्या एका साहित्यिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमावेळीच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि सुधा मूर्ती यांची सभागृहाबाहेर आवारातच भेट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुधा मूर्ती या भिडे गुरुजी यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत आहेत असे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळेचा आहे. या भेटीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनेही व्हायरल केले. मात्र “सुधा मूर्ती यांनी भिडे गुरुजींची भेट घेतली नाही, तर भिडे गुरुजी हेच सुधा मूर्ती यांच्या भेटीसाठी सभागृहात कितीतरी वेळ ताटकळत उभे होते. सुधा मूर्ती यांची भिडे गुरुजींची भेट घेण्याची इच्छाही नव्हती. आपण या व्यक्तीला कशासाठी भेटावे असे सुधा मूर्ती यांनी विचारले होते. मात्र भिडे गुरुजी यांच्या वयाचा आदर करत सुधा मूर्ती यांनी ही भेट घेतली” असा खळबळजनक खुलासा मेहता पब्लिशिंग हाऊसच्या संपादकीय अधिकारी योजना यादव यांनी सोशल मीडियाद्वारे केला आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली.

मात्र त्यांच्या या पोस्टवरून राज्यभरात मोठे वादंग वाजले. काही तासातच योजना यादव यांनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करून टाकली. त्याचे कारण त्याने मात्र स्पष्ट केले नाही. असे असले तरी त्यांच्या या फेसबुक पोस्टचे स्क्रीन शॉट सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.

सुधा मूर्ती आणि भिडे गुरुजी यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संबंधित महिलेवर कारवाई करावी अन्यथा हिंदू वाचक तुमच्या पुस्तकांवर बहिष्कार टाकतील असा सज्जड इशारा भिडे गुरुजी यांच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आला आहे.

भिडे गुरुजी यांचे ट्विट

 

भिडे गुरुजी यांच्या या पावित्र्यानंतर नंतर मेहता पब्लिशिंग हाऊस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजना यादव यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या भेटीबाबत नेमका काय सवाल उपस्थित केला होता ते त्यांच्या पोस्टवरूनच ध्यानात येते. मात्र त्यांची ही मूळ पोस्ट त्यांच्या फेसबुकवर दिसून येत नाही ती त्यांनी डिलीट केली आहे. याबाबतचे वृत्त महाराष्ट्रातील अनेक नामवंत वृत्तपत्रे तसेच दूरचित्रवाणी यांनीही दिले आहे.

योजना यादव यांची फेसबुक पोस्ट

संभाजी भिडेंनी हद्दच केली- योजना यादव
योजना यादव त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की, “ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं.

सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी 5 ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईंना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं.

“त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं.

“आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला.”

“आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तसं पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना त्यांना भेटू द्या.

कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला.

सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ‘ योजना, अगं अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं. आणि सोडून द्यायचं’ आणि ANI सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणं म्हणजे सगळ्यांत दुर्दैव आहे.”

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली प्रमुख हणमंत पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले “सुधा मूर्तीताई या फार मोठ्या व्यक्तीमत्व आहेत. भिडे गुरुजी आणि त्यांची ओळख फार जुनी आहे. वर्षापूर्वी दोनदा सुधा मूर्ती यांनी भिडे गुरुजी यांना भेटण्यासाठी फोन केला होता. काही कारणामुळे भेट होऊ शकली नाही. योगायोगाने त्या सांगलीमध्ये आल्याने त्यांना सांगूनच आम्ही त्यांची भेट घेतली आहे. गुरुजी न सांगता गेले, असं काहीही नाही. सुधा मूर्ती यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्या गुरुजींच्या बद्दल असं काही बोलू शकणार नाहीत. योजना यादव या खोटं बोलत आहेत,”

व्हिडिओ पहा

 

येथे प्रकाशित होणाऱ्या मतांधी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Advt.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका