भिडे गुरुजी आज सोलापुरात
तरुणांना देणार लाठी-काठीचे प्रशिक्षण
थिंक टँक न्यूज नेटवर्क
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी हे आज सोलापुरात येत आहेत. ते तरुणांना लाठी – काठीचे प्रशिक्षण देणार आहेत. याशिवाय “हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा” या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
संभाजीराव भिडे गुरुजी आज सोलापूरात व्याख्यानासाठी येत आहेत. सायंकाळी ४ वाजता सुशील रसिक सभागृह, हॉटेल सूर्याच्यामागे, राघवेंद्र नगर सोलापूर हे व्याख्यान होणार आहे.
सर्व हिंदू बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोण आहेत भिडे गुरुजी
संभाजी भिडे गुरुजी सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त कार्यरत होते. तसंच त्यांचं शिक्षण एमएस्सीपर्यंत झालं आहे.
जून 2017 मध्ये पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आहे.
2009 मध्ये श्री शिवप्रतिष्ठान आणि इतर काही संघटनांनी ‘जोधा अकबर’ या सिनेमाला विरोध केला होता. त्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना 1984 ला झाल्याची नोंद या संघटनेच्या वेबसाईटवर आहे.
‘हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,’ असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा, शिवराज्यभिषेक दिन असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
सांगलीतल्या गावभाग परिसरात भिडे राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान रायगड इथं झाली होती.
हेही वाचा