भारताचे ऐतिहासिक यश, 100 कोटी लोकांचे लसीकरण

लसीकरण मोहिमेत सांगोला तालुकाही अव्वल

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला.

जानेवारी महिन्यामध्ये १६ तारखेपासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. दरम्यानच्या काळात लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने १०० कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे. (India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark)

जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती.

सांगोला तालुक्यात 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. 21 ऑक्टोंबरपर्यंत पहिल्या व दुसऱ्या डोसचे 1 लाख 69 हजार 679 इतके लाभार्थी झाले आहेत. विशेष म्हणजे आज सांगोला तालुक्यात एक ही रुग्ण सापडला नाही.

१ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते.
दरम्यान, कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले.

मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशिल्डभारताचे ऐतिहासिक यश, 100 कोटी लोकांचे लसीकरण आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला १ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला. दरम्यान, आज २१ ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणामध्ये १०० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने गाठला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका