भाऊबीज करून परतताना अपघातात बहिण-भाऊ ठार

पंढरपूरहून बहिणीला भेटून दोघे चालले होते गावाकडे

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
पंढरपूर तालुक्यातील व्हळे येथील थोरल्या बहिणीला भेटून तेथे भाऊबीज साजरी करून आपल्या गावी दरीबडची (ता. जत) जात असताना क्रुझर जीपने उडवल्याने दुचाकीवरील बहिण- भाऊ जागीच ठार झाले. हा अपघात जत तालुक्यातील दरीबडची-दरिकोनूर येथे शनिवारी दुपारी दोन वाजता घडला. ऐन भाऊबीजेदिवशी दोघा सख्या भाऊ – बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

काजल श्रीमंत चौगुले (वय १६) व अक्षय श्रीमंत चौगुले (वय २२ ) अशी अपघातात ठार झालेल्या भाऊ बहिणीची नावे आहेत. यातील अक्षय हा विवाहित आहे. अक्षय हा MH 13 AU 6501 या दुचाकीवरून दरीबडची (ता. जत) या गावाकडे चालला होता. सखे भाऊ – बहिण पंढरपूर येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीज करून घरी परत येत होते.
तर कर्नाटकातील क्रुझर गाडी (KA 46 1514) श्री क्षेत्र गुडापूर येथे देवदर्शनासाठी निघाली होती. दोन्ही वाहनांचा दरीबडची दरिकोनूर या रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

अक्षयची शेवटची भाऊबीज
भाऊबीजला बहिणीकडे जाऊन आलेल्या अक्षयची शेवटची भाऊबीज झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

असा झाला अपघात
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अक्षय चौगुले हा आपल्या लहान बहिण काजलसह पंढरपूर येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीजला मोटरसायकलवरून गेला होता. शनिवारी दुपारी पंढरपूर वरून दरीबडची गावी परत येत होता. दरम्यान सोरडी ते दरिकोनुर या रस्त्यावर मोटरसायकलवरून प्रवास करत असताना एका वळणावर समोरील आजू बाजूच्या झुडपामुळे समोरासमोरील वाहन न दिसल्याने कर्नाटकातील चिकोडी येथून येणाऱ्या क्रुझर व मोटरसायकलची समोरा समोर धडक झाली. यात मोटरसायकल वरील काजल चौगुले व अक्षय चौगुले हे सख्खे भाऊ-बहीण जागीच ठार झाले आहे. ऐन दिवाळीत चौगुले कुटुंबातील सख्या बहिण भावावर काळाने घाव घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका